शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 27, 2014 00:04 IST

मेहकर तालुक्यात चो-यात वाढ.

डोणगाव : सध्या बळीराजा संकटात असतानाच भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून, मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख परिसरात एकाच रात्री तीन शेतकर्‍यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या तोट्या लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन पीक सुकण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे ओलीताची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाला उन्हापासून वाचविण्यासाठी सद्यस्थितीत स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देणे सुरु केले आहे; परंतु पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा वेळोवेळी गायब राहत असल्याने शेतकर्‍यांना रात्रीबेरात्री पिकाला पाणी द्यावे लागत आहे. त्यासाठी रात्रीच्यावेळी विद्युत मोटरपंप, स्प्रिंकलर पाईप आदी महागडे कृषीपयोगी साहित्य शेतकर्‍यांना शेतात ठेवावे लागत आहे. या महागड्या कृषीपयोगी साहित्यावर आता भुरट्या चोरट्यांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे शे तकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरा देशमुख येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन शेतकर्‍यांच्या शेतातील स्प्रिंकलरच्या ४५ तोट्या लंपास केल्या आहेत. त्यामध्ये शेतकर्‍यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. उमरा देशमुख येथील गजानन आबाराव देशमुख यांचे गावाला लागूनच शेत आहे. त्यांच्या शेतात स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देणे सुरु होते. शेतकरी गजानन देशमुख हे शेतातून घरी आले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या स् िप्रंकलरच्या १६ तोट्या लंपास केल्या आहेत. त्याचबरोबर येथीलच भागवत रंगराव देशमुख यांच्या १३ तोट्या व मिलिंद दौलत खंडारे यांच्या शेतातून १२ तोट्या लंपास करण्यात आल्या आहे. या तिन्ही शेतकर्‍यांचे एकूण ४0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भुरट्या चोरांनी आपला मोर्चा शेतातील साहित्य लंपास करण्यावर सुरू केला असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तरी पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून भुरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गजानन देशमुख, भागवत देशमुख, मिलिंद खंडारे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.