काँग्रेस-आघाडी नगरसेवकांचा साडेतीन तास ठिय्या

By Admin | Updated: April 18, 2017 22:36 IST2017-04-18T22:29:49+5:302017-04-18T22:36:02+5:30

खामगाव- काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले.

Three-and-a-half hours for Congress-led corporators | काँग्रेस-आघाडी नगरसेवकांचा साडेतीन तास ठिय्या

काँग्रेस-आघाडी नगरसेवकांचा साडेतीन तास ठिय्या

सर्वसाधारण सभेतील ठरावाच्या प्रती देण्याची मागणी

खामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांच्या कृतीसह पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणाचा निषेधही यावेळी करण्यात आला.
खामगाव नगर पालिकेत २८ फेब्रुवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत पारीत सर्व ठरावांच्या प्रती, सभेच्या मिनिटस् बुकच्या प्रती तसेच सभेची कार्यवृत्त प्रस्तिकेची प्रत मिळावी, यामागणीसाठी काँग्रेस नगरसेवक तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सौ. अर्चना टाले यांनी ६ मार्च, १४ मार्च, १६ मार्च आणि २० मार्च रोजी तसेच १८ एप्रिल रोजी देखील पत्र देण्यात आले. मात्र, या ठरावाच्या प्रती उपलब्ध करून न देता, गटनेत्या अर्चना टाले यांना मंगळवारी तात्कळत ठेवण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली. सोबतच २८ फेब्रुवारीच्या सभेच्या ठरावांच्या प्रतींची मागणी केली. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज संपल्याचे सांगत, कार्यालय सोडले. मुख्याधिकाऱ्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी साडेपाच वाजतापासून सव्वा आठ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधाऱ्यांचाही निषेध करण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेस गटनेत्या सौ. अर्चना टाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, अमय सानंदा, प्रवीण कदम, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, शीतल माळवंदे, भूषण शिंदे, इब्राहिम खान, रेहाना बेगम, संगीता पाटील, अ. रशीद यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला



खामगाव पालिकेतील या घटनाक्रमाचा पाढा काँग्रेस नेते तथा माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी साडेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे वाचला. मुख्याधिकाऱ्यांसोबतच खामगाव पालिकेतील सत्ताधाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे भ्रमण दूरध्वनीवरून तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री आंदोलन करण्याऐवजी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आपले ग्राहाणे मांडण्याच्या सूचना केल्या. काँग्रेसनेते सानंदा यांनी पालिकेतील आंदोलन थांबविण्याचा निरोप पालिकेत दिला. त्यानंतर काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी सव्वा आठ वाजता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील आंदोलन थांबविले.

Web Title: Three-and-a-half hours for Congress-led corporators