शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननामुळे प्रकल्पाच्या भिंतीला धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

मेहकर : समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या गौण खनिजासाठी ठिकठिकाणी उत्खनन केले जात आहे. यासाठी काही ठिकाणी शेती विकत घेऊन उत्खनन ...

मेहकर : समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या गौण खनिजासाठी ठिकठिकाणी उत्खनन केले जात आहे. यासाठी काही ठिकाणी शेती विकत घेऊन उत्खनन केले जात आहे तर काही ठिकाणी गावतलाव, पाझर तलावातून गौण खनिज काढले जात आहे. त्यामुळे त्या तलावाची अतिरिक्त पाणी पातळी वाढून तलावाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

तलावाच्या या प्रश्नाकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहेत. समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या मुरुमासाठी जे उत्खनन झाले त्यात इतर शेतकऱ्यांकडून शेती घेण्यात आली. मात्र, ज्या शेतीचे उत्खनन करायचे त्याचे अगोदर सीमांकन व्हायला हवे होते. कित्येक जागी तसे न करता सरळ उत्खनन करण्यात आले असून, तेही नियमबाह्य. काही ठिकाणी रस्त्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. भविष्यात शेतकऱ्यांचे वाद उफळणार तर काही ठिकाणी शेती ढासळल्याने शेजारील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. एकीकडे शासनाने उत्खननासाठी जे नियम दिले, त्यात काही मीटरपेक्षा जास्त खोल उत्खनन करू नये, असे सांगितले आहे; परंतु त्यापेक्षा कित्येक पट जास्त खोल उत्खनन झालेले आहे. ज्यामुळे इतर शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. मात्र, याकडे संबंधित विभागाने कोणतेही लक्ष दिले नाही.

नियमांपेक्षा अधिक उत्खनन

गाव तलाव, पाझर तलाव किंवा धरण यांचा पाणीसाठा ठरलेला असून त्यानुसार त्या तलावाच्या भिंतीसह त्याचे स्ट्रक्चर ठरलेले असते. या अगोदरही अनेक तलावातून फक्त गाळ उपसा करण्याकरिता शासनानेच अनेक उपक्रम राबविले आहेत. मात्र, गाळापेक्षा अधिक उत्खनन केल्यास त्या प्रकल्पाच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होत आहे.

महसूलही बुडतोय

महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गौण खनिज उत्खननाबाबतीत गैरप्रकार होत असल्यास वरिष्ठ कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे; परंतु येथे अनेक प्रकाराकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे महसूल तर बुडतोच शिवाय भविष्यात शेतकरीबांधवांचे नुकसान होण्याचा धोका वाढत आहे.