शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड येथे शंभरावर जनावरे दगावली

By admin | Updated: July 26, 2014 22:49 IST

अज्ञात आजाराने जवळपास १00 जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

खामगाव : तालुक्यात दोन दिवसांच्या पावसानंतर हिवरखेड येथे अज्ञात आजाराने जवळपास १00 जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच गावातील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जनावरे दगावल्याने शेतकर्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या पशुधन मालकांचे सुमारे दहा लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या प्रकारामुळे संपूर्ण खामगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, पशुवैद्यकीय पथक गावात दाखल झाले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतरही जिल्ह्यात पावसाचा थेंब नव्हता. त्यामुळे शेतकर्‍याजवळ होते नव्हते जनावरांचे वैरणही संपले होते. जनावरांना चारा शिल्लक नसल्यामुळे शेतकर्‍यांनी मिळेल त्या झाडपाल्यावर जनावरे जगवली. आता कोठे पावसाला सुरूवात झाली होती. तालुक्यात २२ जुलै रोजी अतवृष्टी होऊन तब्बल ८0 मि. मी. पाऊस पडला. या पावसानंतर हिवरखेड या गावात जनावरांना अचानक अज्ञात रोगाची लागण झाली व सुदृढ असलेले शेकडो गायी-गोरे मृत्युमुखी पडू लागली. हा प्रकार पाहून पशुधन मालक आवाक झाले. जनावरे नेमकी कशाने मरत आहेत, हे न कळणारे कोडे होते. यासंदर्भात पशुधन मालकांनी खामगाव पंचायत समितीला तातडीने घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच आज शुक्रवार २५ जुलै रोजी खामगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. एच. बोहरा यांच्या नेतृत्वात एक पथक हिवरखेड येथे दाखल झाले. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक डॉ. एन. जी. करंकार, डॉ.तिडके, डॉ. जे. एस. खुमकर यांचा समावेश होता. त्यांनी हिवरखेड येथे भेट देऊन मृत जनावरांची पाहणी केली व काही जनावरांचे शवविच्छेदन केले. या आपत्तीमध्ये हिवरखेड येथील लाला हटकर, अरविंद वाकोडे, नवृत्ती परसराम राऊत, रमेश कडाळे यांची प्रत्येकी दोन अशी १0, तर गोपाल सुगदेव हटकर यांची ८, विजय बाळू हटकर यांची ६, ज्ञानदेव कृष्णा धानखेडे यांची ६ जनावरे त्याचप्रमाणे विठोबा मनसाराम शिंगाडे यांच्या ५0 गायी व गोरे मृत्युमुखी पडले. सुनील शालीग्राम हटकर व लोखंडकार याची २२ जनावरे, तानाजी हटकर यांची १0 यासह २0 ते २५ शेतकर्‍यांची जनावरे अज्ञात रोगाने दगावली आहेत. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी तसेच पशुधन मालकसुद्धा धास्तावले आहेत.