‘त्या’ कुटुंबियांचे पोलिसांनी केले स्थलांतर

By Admin | Updated: July 8, 2014 23:42 IST2014-07-08T23:42:17+5:302014-07-08T23:42:17+5:30

राहुडवासीयांच्या मागणीमुळे पोलिसांनी काल रात्री जडी-बुटी विकणार्‍यांचे ३0-३५ कुटुंब घरांचे स्थलांतर केले.

'Those' families moved by police | ‘त्या’ कुटुंबियांचे पोलिसांनी केले स्थलांतर

‘त्या’ कुटुंबियांचे पोलिसांनी केले स्थलांतर

खामगाव : शहरानजीकच्या घाटपुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून जडी-बुटी विकणार्‍यांचे ३0-३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र त्यातील काही चोर असल्याच्या संशयावरुन घाटपुरी, जळका भडंग व राहुडवासीयांच्या मागणीमुळे पोलिसांनी काल रात्री या घरांचे स्थलांतर केले. पिंपळगाव राजा पो.स्टे.चे हद्दीत येणार्‍या राहुड येथे ६ जुलैचे रात्री गणेश हळे यांच्या घरी चोरीची घटना घडली. यानंतर काही गावकर्‍यांनी अज्ञात चोरट्यांचा पाठलाग केला असता ते घाटपुरीनजीकच्या जडी-बुटी विकणार्‍यांच्या झोपडीत शिरले होते. त्यामुळे त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता त्या कुटुंबीयांनी दगडफेक केली होती. त्यामुळे काल रात्री १0 वाजताचे सुमारास घाटपुरी, राहुड व जळका भडंग नागरिक व जडी-बुटी विकणारे आमनेसामने आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक नीता गायकवाड कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र गावकर्‍यांचा जमाव क्षुब्ध झाल्याने त्यांनी ही माहिती शहर पो.स्टे.चे ठाणेदार दिलीप पाटील यांना दिली. तसेच घटनेचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गावकर्‍यांनी या कुटुंबीयांना गावातून हटविण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी स्वत: या कुटुंबीयांचे नांदुरा येथे स्थलांतर केले. परिसरात चोरीच्या घटना तसेच चोर आल्याच्या अफवांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे काल घाटपुरी हा प्रकार घडला.

Web Title: 'Those' families moved by police