शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोताळ्यात पुन्हा खाद्य तेलाची चोरी

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

खाद्य तेलाचे पाच बॅरल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २८ मेच्या मध्यरात्री दरम्यान घडली आहे.

मोताळा : मोताळा-नांदुरा रोडवरील गजानन किराणासह आठवडी बाजार परिसरातील दोन दुकानांसमोर असलेले खाद्य तेलाचे पाच बॅरल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २८ मेच्या मध्यरात्री दरम्यान घडली आहे. सकाळी उघडकीस आलेल्या खाद्य तेल चोरीच्या या दुसर्‍या घटनेत चोरट्यांनी जवळपास ६८ हजारांच्या तेलावर डल्ला मारत बोराखेडी पोलिसांना पुन्हा एकदा आव्हान केले आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी स्थानिक वार्ड क्रमांक १ मधील, मोताळा-नांदुरा रोडवरील गजानन बोदडे यांचे गजानन किराणा दुकानासमोरून एक बॅरल, आठवडी बाजार परिसरातील जयराज सचदेव यांचे राधास्वामी किराणा दुकानासमोरून तीन बॅरल व जीवन बिसन सांगळे यांचे ङ्म्रीकृष्ण किराणा दुकानासमोरून एक असे एकूण पाच सोयाबीन खाद्य तेलाचे भरलेले बॅरल लंपास केले. एकाच रात्री चोरट्यांनी चारचाकी वाहनातून नियोजनात्मक पद्धतीने खाद्य तेल लंपास केल्याची बाब सीसी कॅमेर्‍याच्या फुटेजवरून पोलिसांच्या लक्षात आली आहे. चोरट्यांनी लंपास केलेल्या खाद्य तेलाच्या प्रत्येक बॅरलमध्ये प्रति बॅरल १८0 किलो सोयाबीनचे खाद्य तेल असून, जवळपास ९00 किलो खाद्य तेल चोरीस गेले आहे. कोणत्याही प्रकारची तोड-फोड व वाजागाजा न करता झालेल्या या चोरीमध्ये गजानन बोदडे यांचे १३ हजार ५00 रूपये, जयराज सचदेव यांचे ४0 हजार ५00 रूपये तर जीवन सांगळे यांचे १३ हजार ५00 रूपये असे एकूण ६७ हजार ५00 रूपयाचे नुकसान झाले आहे. गेल्या १५ मार्चच्या रात्रीसुद्धा अश्याच प्रकारे बाजारातील रफिकखान नथ्थेखान यांच्या दुकानासमोर ठेवलेले तीन तेलाचे बॅरल चोरट्यांनी लंपास करून ४१ हजाराचे नुकसान केले होते. त्याचा पोलिसांकडून अद्याप तपास लागलेला नसताना २८ मेच्या रात्री पुन्हा अज्ञात चोरट्यांनी संधी साधून व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. मंगळवारच्या रात्री झालेल्या या चोरीदरम्यान चोरांनी जाता-जाता पुन्हा बाजारातील रफिकखान नथ्थेखान यांच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु मागच्या चोरीचा अनुभव पाहता रफिकखान हे दुकानात झोपलेले होते. दुकानासमोर ठेवलेले खाद्य तेलाचे बॅरल उचलतेवेळी आवाज आल्यामुळे ते जोराने ओरडले होते. त्यांचा आवाज ऐकून चोर वाहनासह पळून गेले. या घटनेची माहिती तत्काळ रफिकखान यांनी बोराखेडी पोलिसांना दिली होती; परंतु कोणताही फायदा झाला नाही. या चोरीबाबत किराणा दुकानाचे मालकांनी पोलिसांना माहिती कळविली असून, परिसरातील बिट जमादारांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला आहे. आठवडी बाजारातील जयराज सचदेव यांच्या दुकानालगतच भाई अजीज दाऊद यांच्या दुकान परिसरात सीसी कॅमेरे लावलेले आहेत. या कॅमेर्‍यामध्ये जयराज सचदेव यांच्या राधास्वामी किराणा दुकानासमोरून खाद्य तेल चोरत असतानाच्या चोरांच्या हालचाली कैद झालेल्या आहेत. या फुटेजवरून बोराखेडी पोलिस चोरांचा मागोवा काढण्याच्या प्रयत्नात आहेत; मात्र पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्याने चोरट्यांना चोरी करण्याचे धाडस निर्माण होत असल्याचे शहरवासीयांमध्ये बोलल्या जात आहे. चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसविण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे.