शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या आवारात विष प्राशन

By admin | Updated: March 10, 2015 01:56 IST

खामगाव येथे एका युवकांची गळफास घेऊ न आत्महत्या तर दुस-या युवकाचा विष प्राशुन आत्मह त्येचा प्रयत्न.

खामगाव (बुलडाणा) : पत्नीचा विरह सहन न झाल्याने एकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची, तर दुसर्‍याने शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच विष घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. या घटना अनुक्रमे ८ मार्चच्या मध्यरात्री व ९ मार्चचे दुपारी १२.३५ वाजेदरम्यान घडली. स्थानिक समता कॉलनीतील रहिवासी अतुल पुरुषोत्तम मांडोकार (वय ३६) याची पत्नी घरगुती वादा तून चार वर्षाअगोदर माहेरी मलकापूर येथे मुलीला घेऊन निघून गेलेली आहे. तसेच तिने अतुल मांडोकार यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दिलेली आहे. दरम्यान, अतुल मांडोकार ८ मार्चच्या मध्यरात्रीनंतर राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पत्नी व मुलीच्या विरहामुळे तणावात येऊन अतुल मांडोकार यांनी जीवन संपविले, असे सांगण्यात येत आहे. दुसर्‍या घटनेत नांदुरा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवाशी नंदकिशोर प्रल्हाद वाकोडे व पत्नी रू पाली यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते. त्यामुळे रूपाली ही दोन मुलांना पतीकडे सोडून माहेरी खामगाव येथे निघून आलेली आहे. वारंवार विनवणी करूनही ती परत येत नसल्याने नंदकिशोर याने स्थानिक शहर पोस्टेच्या समुपदेशन केंद्रामार्फतही पत्नीला परत आणण्याचे प्रयत्न केले; मात्र काही केल्या ती परत येत नसल्याने त्याने आज चक्क शहर पोलीस ठाण्यात येऊन विषारी औषध प्राशन केले. या प्रकारामुळे उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी पोलसांनी त्याला तात्काळ येथील सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0९ नुसार गुन्हाही दाखल केला आहे. या घटनांमुळे समाजातील धुरिणांनी तंटे सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.