शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 10, 2014 01:33 IST2014-07-09T23:41:04+5:302014-07-10T01:33:52+5:30

उंद्री येथील शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

In the teacher's suicide case filed a complaint | शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

उंद्री : येथील शहाजी राजे विद्यालयातील शिक्षकाने काल रात्रीच्या सुमारास शाळेतच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज ९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक अनंता चेके व अवचार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव तालुक्यातील गेरु माटरगाव येथील रहिवासी शिक्षक अशोक रावसिंग साबळे (वय ३१) हे येथील शहाजी राजे विद्यालयात कार्यरत होते. तर त्यानंतर त्यांना व्दारकाबाई खेडेकर प्राथमिक शाळा उंद्री येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर गेल्या ३ ते ४ महिन्यापासून ते कार्यरत नव्हते. दरम्यान काल ९ जुलै रोजी रात्री शिक्षक अशोक रावसिंग साबळे यांनी विषारी औषध प्राशन करुन शहाजी राजे विद्यालयाच्या प्रांगणात आत्महत्या केली. नित्या प्रमाणे आज सकाळी विद्यार्थी शाळेत आले असता अशोक साबळे यांचा मृतदेह विद्यार्थ्यांना दिसून आला. याबाबत त्यांनी शिक्षकांना माहिती दिल्यानं तर पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला असता मृतकाचे खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये संस्थेने शाळेवर रुजू करुन घेण्याबाबत फसवणूक केल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी प्रदीप भजनसिंग मछले (वय २४) यांनी अमडापूर पो.स्टे.ला फिर्याद दिली असून पोलिसांनी मुख्याध्यापक अनंता चेके व अवचार यांच्याविरूध्द भादंवि ३0६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर शिक्षकाला तीन महिण्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर नियुक्ती दिली होती, तथापि निर्धारीत वेळेत प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांची सेवा आपोआप खंडीत झाली, यात संस्थेचा कोणताही दोष नाही असे संस्थेच्या सचिवांनी सांगीतले.

Web Title: In the teacher's suicide case filed a complaint