शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

टँकर मंजुरीचे अधिकार आता एसडीओंना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:17 IST

Khamgaon News : टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : उन्हाळ्याच्या दिवसांत शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या उद्भवते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी टँकर कुठे-कुठे पाठवावे, यांची मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येते. मात्र, कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता जिल्हा प्रशासकीय यंत्रणा संसर्ग रोखण्यासाठी सक्रिय असल्याने आता टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे.  ग्रामीण, नागरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. शासनाने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ग्रामीण नागरी क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांकरिता वेळोवेळी स्थायी आदेशाद्वारे सूचना दिल्या आहेत. ३ फेब्रुवारी १९९९ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत कारवाई निश्चित करण्यात आलेली आहे. या स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या उपाययोजना ३० जूनपर्यंत राबविणे आवश्यक आहे. टँकरच्या मंजुरीचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांनाच होते. तथापि, सध्या कोविड-१९ म्हणजेच कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे जिल्हाधिकाऱ्यांवर कामाचा बोजा आलेला आहे.यातच ठिकठिकाणी स्थलांतर करणाऱ्या मजूर व नागरिकांसाठी निर्माण केलेल्या शिबिराकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकत नसल्यास टँकरद्वारे पिण्याच्या साधारण वापरासाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी टँकरचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याची गरज  गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशीचा पेरा १ हजार ६१ हेक्टर क्षेत्रफळावर वाढणार आहे. तर सोयाबीनचा पेरा १ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रफळावर घटणार आहे. तूर १ हजार ५७१ व मका पीक ३८२ हेक्टर क्षेत्रफळावर वाढणार असल्याचा अंदाज आहे.  गतवर्षी सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे असंख्य शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला सामोरे जावे लागले होते.  त्या अनुषंगाने यावर्षी कृषी विभागाने बियाणांसंदर्भात योग्य नियोजन करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याची गरज आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई