खामगाव येथे कर्मचा-यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

By Admin | Updated: December 20, 2014 00:09 IST2014-12-20T00:09:45+5:302014-12-20T00:09:45+5:30

३५0 शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचा-यांचा सहभाग.

Taluka level sports competition in Khamgaon | खामगाव येथे कर्मचा-यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

खामगाव येथे कर्मचा-यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

खामगाव (बुलडाणा): जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा १९ डिसेंबर रोजी ये थील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणामध्ये उत्साहात सार्ज‍या झाल्या.
जि.प.च्यावतीने तालुका पातळीवर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १९ व २0 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. त्यानुसार आज १९ डिसेंबर रोजी खामगाव पं.स.च्या वतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात तालुकास्तरीय क्रीडा सामने घेण्यात आले. उद्घाटन पं.स.सभापती कुसुमताई तायडे यांनी केले. अध्यक्षस्थानी जि.प.हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा भावसार होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.अध्यक्ष भास्करराव ठाकरे, उपसभापती चैतन्य पाटील, सदस्य सज्जाद उल्लाखान, माजी सदस्य संजय तायडे, श्रीराम तिवाले, गटशिक्षणाधिकारी गायकवाड, अधीक्षक महालक्ष्मे यांच्यासह जवळपास ३५0 शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासह जि. प.विभागातील कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.

Web Title: Taluka level sports competition in Khamgaon