कोवीड-१९ हेल्पलाईन सेंटरचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST2021-04-12T04:32:41+5:302021-04-12T04:32:41+5:30

बुलडाणा : कोरोनोच्या महामारीने सर्वांसमोर खूप मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा संकटकाळी काँग्रेस सेवाधर्म जाणून आपला मदतीचा हाथ ...

Take advantage of the Kovid-19 Helpline Center | कोवीड-१९ हेल्पलाईन सेंटरचा लाभ घ्या

कोवीड-१९ हेल्पलाईन सेंटरचा लाभ घ्या

बुलडाणा : कोरोनोच्या महामारीने सर्वांसमोर खूप मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा संकटकाळी काँग्रेस सेवाधर्म जाणून आपला मदतीचा हाथ पुढे सरसावत आहे. नागरिकांच्या मदतीसाठी कोवीड-१९ हेल्पलाईन सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. या हेल्पलाईन सेंटरचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.

जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन यांच्या हस्ते कोवीड-१९ हेल्पलाईन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल बोंद्रे होते. प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामबाबू उमाळकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, जि. प. अध्यक्ष मनिषाताई पवार, प्रदेश सरचिटणीस ॲड. जयश्रीताई शेळके, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडेकर, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक देशमाने, रणजितसिंह राजपूत, सुनील मोरे, काँग्रेस नेते अशोक पडघान, सतिष मेेहेंद्रे, शहराध्यक्ष दत्ता काकस, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, डाॅ. इसरार जमादार आदिंची उपस्थिती होती. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जिल्हा काँग्रेस संचालित कोवीड-१९ हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महात्मा फुले जयंतीनिमित्त कोवीड हेल्पलाईन सेंटर उघडण्याचा कार्यक्रम राज्यभर राबविण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार बुलडाण्यात हेल्पलाईन सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती राहुल बोंद्रे यांनी दिली.

Web Title: Take advantage of the Kovid-19 Helpline Center