पुलाचे अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:43+5:302021-07-07T04:42:43+5:30

अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे सुरा येथील नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन ...

Take action against the contractor who is partially working on the bridge | पुलाचे अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा

पुलाचे अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा

अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे सुरा येथील नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदारास देण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धार्थ पैठणे यांनी जिल्हाधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

देऊळगाव मही ते पाडळी शिंदे या मार्गावरील मौजे सुरा येथील नदीवरील पुलाचे काम अर्धवट आहे. रस्त्याच्या कडेला मातीचा भराव टाकल्याने पावसाळ्यात वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने पूल व तिथून चारशे वीस मीटर नवीन डांबरीकरणाचा रस्ता असे काम मंजूर केले; परंतु ठेकेदाराने नियमाप्रमाणे हे काम केले नसल्याच्या तक्रारी हाेत आहे तसेच पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे कंत्राटदाराला हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

040721\1549img-20210704-wa0111.jpg

सुरा पुलाचे फोटो

Web Title: Take action against the contractor who is partially working on the bridge