डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या

By Admin | Updated: December 5, 2014 00:26 IST2014-12-05T00:26:55+5:302014-12-05T00:26:55+5:30

कुटुंब नियोजनाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

Surgery stops because there is no doctor | डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या

डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या

बुलडाणा : कुटुंब नियोजन या राष्ट्रीय कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्ह्यात लागणारी पुरेशी यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टांचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. आधीच डॉक्टरांची कमतरता त्यात उपलब्ध डॉक्टरांवरच जास्तीच्या कामाचा बोजा पडत असल्यामुळे या राष्ट्रीय उपक्रमाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
दरवर्षी आरोग्य विभागाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट दिल्या जाते. या उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभागाला नियोजन करावे लागते. मार्च २0१४ पर्यंत जिल्ह्याला १३ हजार ३३९ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १0 हजार ६९३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यामुळे यावर्षीही उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य विभागाची दमछाक होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत; मात्र या आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची कमतरता आहे. किमान एका आरोग्य केंद्रात एक आयुर्वेदिक व एक सर्जन असे दोन वैद्यकीय अधिकारी असावेत, असा नियम आहे; मात्र सध्या जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांची केवळ ३५ पदे भरलेली असून, अध्र्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. जी पदे भरलेली आहेत त्यातील ५0 टक्के पदे ही आयुर्वेदिक डॉक्टरांची आहेत.

Web Title: Surgery stops because there is no doctor