सुलतानपूर सेंट्रल बँकेचा कारभार ढेपाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:52+5:302021-07-07T04:42:52+5:30

सुलतानपूर : स्थानिक सेंट्रल बँक शाखा दुसरीकडे स्थलांतरित केल्याने मागील दीड ते दोन महिन्यांपासून लिंक फेलच्या नावाखाली ...

Sultanpur Central Bank collapses! | सुलतानपूर सेंट्रल बँकेचा कारभार ढेपाळला !

सुलतानपूर सेंट्रल बँकेचा कारभार ढेपाळला !

सुलतानपूर : स्थानिक सेंट्रल बँक शाखा दुसरीकडे स्थलांतरित केल्याने मागील दीड ते दोन महिन्यांपासून लिंक फेलच्या नावाखाली व्यवहार ठप्प आहेत. याबाबत अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रारी देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही़ या बँकेचे कामकाज तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी क्षेत्रीय प्रबंधक अकोला यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़

३ जुलै रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात असेही म्हटले आहे की, शाखाधिकारी यांचा बँकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने बँकेत येणाऱ्या नागरिकांना हे कर्मचारी छोटी-मोठी कारणे पुढे करून त्रास देऊन त्यांना उद्धटपणाची वागणूक देतात. बँक सुरू व बंद करण्याची, तसेच कामकाजाची नियमित वेळ न ठेवता मनमानी केली जाते. बँकेची एटीएम सुविधादेखील दोन महिन्यांपासून बंद आहे. बँकेचे स्टेटमेंट वेळेवर दिले जात नाही. नेहमीच प्रिंटर बंद असल्याचा बहाणा करून पासबुक अपडेट करण्यास मुद्दाम टाळाटाळ केली जाते, असा आराेपही निवेदनात केला आहे. निवेदनाच्या प्रती अग्रणी बँक अधिकारी तथा लोणार तहसीलदार यांना पाठविल्या असून त्यावर दामोदर लाहोटी, विजय खोलगडे, सुरेश सुरुशे, विठ्ठल ढोले, तुळशीदास धुडकेकर, भारत जुमडे, तानाजी भानापुरे, कैलास जुमडे, गजेंद्र रत्नपारखी, शें. खाजा शे. उमर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ ८ दिवसांच्या आत या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी व व्यावसायिकांच्या हितार्थ बँकेसमोर बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा माजी सरपंच विजय खोलगडे यांनी दिला आहे़

दुसरे सर्व्हर जोडून झाल्यास बँकेचे व्यवहार लवकरच सुरळीत केले जातील, तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांकडून खातेदारांना दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबतची तक्रार वरिष्ठांना कळवली जाईल.

जिवन गाडेकर

शाखा व्यवस्थापक

सेंट्रल बँक शाखा सुलतानपूर

Web Title: Sultanpur Central Bank collapses!