पोलिस पाटलाची जाळून घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: July 10, 2014 01:32 IST2014-07-09T23:47:39+5:302014-07-10T01:32:49+5:30

नांदुरा तालुक्यातील खेर्डा येथील घटना; थकीत कर्जामुळे होते वैफल्यग्रस्त

Suicide by burning a police patrol | पोलिस पाटलाची जाळून घेऊन आत्महत्या

पोलिस पाटलाची जाळून घेऊन आत्महत्या

नांदुरा : अंगावर रॉकेल घेवून शेतकरी पोलिस पाटलाने आत्महत्या केल्याची घटना आज ९ जुलैच्या सकाळी १0 वाजता तालुक्यातील खेर्डा येथे घडली. दिनकर रामचंद्र कांडेलकर वय ५८ रा. खेर्डा यांनी आज ९ जुलै रोजी सकाळी १0 वाजेदरम्यान राहत्या घरात अंगावर रॉकेल घेवून स्वत:ला जाळून घेतले. त्यांना ताबडतोब खामगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या २५ वर्षांंपासून ते खेर्डाचे पोलिस पाटील म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर महाराष्ट्र बँक चांदुरबिस्वाचे अडीच लाख रुपये थकीत कर्ज होते. त्याच बरोबर पाईपलाईन व पिककर्ज सुध्दा होते, अशी माहिती मृतक दिनकर कांडेलकर यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. मृतक दिनकर कांडेलकर यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली यासह बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Suicide by burning a police patrol