शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत!

By admin | Updated: September 25, 2015 00:08 IST

चंदनशेष मंडळाच्या पुढाकाराने ग्रामस्थांना आत्महत्या न करण्याची शपथ.

खामगाव : श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यानुसार तालुक्यातील चिखली येथे व शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजाराची मदत माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्याहस्ते देण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांनी न डगमगता या संकटाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठय़ा धैर्याने सामोरे जावे, असे आवाहन माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी केले. श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळातर्फे २४ सप्टेंबर रोजी भोनगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व.रामेश्‍वर त्र्यंबक रताळे व चिखली बु. स्व. रामराव जानराव मानकर यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १0 हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी खामगाव कृउबास सभापती संतोष टाले, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विजय काटोले, जि.प. सदस्य श्रीकृष्ण धोटे, नगरसेवक अँड.मंदीपसिंग शिख, शांताराम करांगळे, श्री चंदनशेष गणेशोत्सव मंळाचे अध्यक्ष शशिकांत इंगळे उपस्थित होते. यावेळी दिलीपकुमार सानंदा यांनी मानकर कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका, अशी शपथ देण्यात आली. यावेळी दिलीप जाधव, अमर पिंपळेकर, दिनेश गावंडे, किशोर जाधव, मनोज खोंड, सोनु जाधव, पिंटु रिंढे, भूषण शिंदे, मदन गावंडे, सत्तु शर्मा, श्रीकृष्ण ताठे, गजानन ठाकरे, विनोद कडुकार, मोहन ताठे, बळीराम सोनोने आदी उपस्थित होते.