शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

 पैनगंगा नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन मुलांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:11 IST

कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे आणि दुधा येथील पंकज पंढरी लोढे ही दोन मुले थोडक्यात बचावली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: एकीकडे पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असतानाच बैलांना पाणी पाजण्यासाठी बैलगाडीद्वारे पैनगंगा नदीपात्रात गेलेली दोन मुले बैलगाडीसह नदीपात्रात वाहून जाताजाता थोडक्यात बजावली. दुधा-ब्रम्हपुरी येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुले थोडक्यात वाचली. मात्र या घटनेत बैलगाडीला जुंपलेला एक बैल मात्र ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.दरम्यान, नदीपात्रात वाहून गेलेली बैलगाडी व बैलांना वाचविण्यासाठी थेट पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्याची विनंती पाटबंधारे विभाच्या उपअभियंत्यांना करण्यात आली होती. अल्पावधीसाठी पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे नागरिकांना दोन्ही मुलांसह वाहून जाणारी बैलगाडी व एका बैलाला वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेत दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या मुलांमध्ये कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे आणि दुधा येथील पंकज पंढरी लोढे ही दोन मुले थोडक्यात बचावली.कल्याणा येथील हर्षल जनार्दन ठाकरे हा पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा दिवाळीसाठी दुधा येथे त्याचे मामा पंढरी लोढे यांच्याकडे यांच्याकडे आला होता. पंढरी लोढे यांचा मुलगा पंकज पंढरी लोढे हा दहाव्या वर्गामध्ये असून विवेकानंद मंदिरामध्ये तो शिकतो. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी हर्षल व पंकज हे दोघेजण बैलगाडीद्वारे दुधा येथील पैनगंगा नदीच्या पात्राकडे गेले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्याच्या धारेत आल्याने बैलगाडी सह दोघेही वाहू लागले. हा सर्व प्रकार नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी बघितला. त्यांनी आरडाओरड केल्याने नदीकाठावर असलेल्या दुधा, ब्रह्मपुरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभिर्य पाहता प्रसंगावधान राखून काही नागरिकांनी नदीपात्रात उड्या मारून दोन्ही मुले व एका बैलास वाचविण्यात यश मिळवले. या ग्रामस्थामध्ये समाधान हैबती म्हस्के, शालिकराम महाकाळ, गुलाबराव इटिवाड, सुरेश इटिवाड, पंडितराव देशमुख, गौरव देशमुख, नागेश महाकाळ, प्रल्हाद दळवी, रवि पवार, सुनील शेषनारायण म्हस्के यांचा समावेश होता.दोन्ही मुलांची प्रकृती स्थिरपुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या दोन्ही मुलांना वाचविण्यात यश आले आहे. घटनेनंतर दोन्ही मुलांची हिवराआश्रम येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. एका बैलालाही या घटनेदरम्यान वाचविण्यात आले. दुसरीकडे ही घटना घडली तेव्हा पेनटाकली प्रकल्पाचे तीन दरवाजे दहा सेमींने उघडलेले होते. तुलनेने पाण्याचा विसर्ग कमी होता. त्यामुळे पाणी नदीपात्रातच होते. मात्र बैलगाडी व मुले ही थेट नदीतील धारेच्या प्रवाहात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदी