विद्युत तारांमध्ये मांजा अडकला, १५ टीव्ही जळले

By Admin | Updated: January 17, 2015 00:17 IST2015-01-17T00:17:07+5:302015-01-17T00:17:07+5:30

खामगाव येथे वीज तारांमध्ये मांजा अडकल्यानंतर स्पार्किंंग झाल्याने परिसरातील नागरिकांचे टीव्ही, विद्युत उपकरणे जळली.

Stunting of electricity into the electricity star, 15 TVs burnt | विद्युत तारांमध्ये मांजा अडकला, १५ टीव्ही जळले

विद्युत तारांमध्ये मांजा अडकला, १५ टीव्ही जळले

खामगाव (जि. बुलडाणा): मकरसंक्रांतीची पतंगबाजी दुर्घटनेस कारणीभूत ठरली आहे. काल दुपारी ४ वाजता स्थानिक चांदमारी भागात वीज तारांमध्ये स्पार्किंग होऊन १५ ते २0 नागरिकांचे टीव्ही व काही विद्युत उपकरणे जळली आहेत.
चांदमारीतील हनुमान मंदिरानजीक काही मुले पतंग उडवित असताना एक पतंग वीज तारात अडकली. सदर पतंगाला नायलॉनचा मजबूत चायना मांजा होता. त्यामुळे अडकलेली पतंग ओढताना वीज तारांच्या घर्षणामुळे स्पार्किंंग झाले. यामुळे या भागातील १५ ते २0 जणांच्या घरातील टीव्ही संच जळले. इतरही काही विद्युत उपकरणे जळल्याची चर्चा आहे

Web Title: Stunting of electricity into the electricity star, 15 TVs burnt