विद्यार्थ्यांंंची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती !

By Admin | Updated: July 24, 2015 00:50 IST2015-07-24T00:50:46+5:302015-07-24T00:50:46+5:30

कनका येथील जिल्हा परिषद शाळेला बोअरवेलची प्रतीक्षा.

Students' drinking water wandering! | विद्यार्थ्यांंंची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती !

विद्यार्थ्यांंंची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती !

अनिल ठोकळ/ कनका (जि. बुलडाणा): येथील जि.प. शाळेला कित्येक वर्षांंपासून बोअरवेलची प्रतीक्षा आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने शाळेतील सुमारे १८८ विद्यार्थ्यांंना  पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंंत वर्ग असून, त्यामध्ये १८८ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांंसाठी एकूण ७ शिक्षक या शाळेवर कार्यरत आहेत. शाळेचा कारभार सुरळीत चालू असून, विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असतात. या विद्यार्थ्यांंंंनी शाळेच्या प्रांगणात झाडेसुद्धा लावलेली आहेत. उन्हाळ्यात या झाडांना विद्यार्थ्यांंंंनी सलाईनच्या डब्यात पाणी टाकून वाढविले. शाळेतील झाडे जगविण्यासाठी विद्यार्थ्यांंनी अथक परिश्रम घेतले व झाडांना जीवनदान दिले; परंतु या शाळेतील विद्यार्थ्यांंनाच पाणी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांंना शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने सर्व विद्यार्थ्यांंची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. त्यासाठी येथे गेल्या अनेक वर्षांंपासून बोअरवेलची मागणी केल्या जात आहे.  

Web Title: Students' drinking water wandering!