भरधाव वाहनाने घेतला पेट

By Admin | Updated: March 22, 2017 01:36 IST2017-03-22T01:36:50+5:302017-03-22T01:36:50+5:30

वाहनासोबतच कापडाच्या गाठी जळून खाक

Stomach carrying the carriage | भरधाव वाहनाने घेतला पेट

भरधाव वाहनाने घेतला पेट

वरवट बकाल(जि. बुलडाणा), दि. २१- धावत्या वाहनाने पेट घेतल्याने वाहन व त्यामधील कापडाच्या गाठी जळून खाक झाल्या. ही घटना भगतपुरा गावानजीक मंगळवारी घडली.
तालुक्यातील टुनकी खुर्द येथील योगेश गोकुल बोरसे यांच्या मालकीचे मालवाहू वाहन क्रमांक एमएच२८-एबी २१५ ने कापडाच्या गाठी घेऊन जात असताना लाडणापूर ते करमोडा गावादरम्यान भगतपुरानजीक या वाहनाच्या कॅबिनने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला.
ही घटना लक्षात येताच गाडीचालक व मालक अनंता बोरसे व आणखी एक अशा दोघांनी वाहन थांबवून वाहनातून खाली उतरले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. थोड्या वेळताच आगीने रौद्र रूप धारण केले होते.
यावेळी येथे उपस्थित असलेल्या परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आग मोठय़ा प्रमाणात लागली असल्यामुळे या आगीत वाहन व त्यामधील कापडाच्या गाठी असे साहित्य जळून खाक झाले. आग कशामुळे लागली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Stomach carrying the carriage