शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात परदेशी पाहुण्यांचा मुक्काम

By admin | Updated: October 27, 2014 23:26 IST

हिवाळ्याची चाहूल, स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात.

बुलडाणा : गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात थंडी जाणवत असून, स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्याला निसर्गसौंदर्य लाभल्यामुळे अनेक परदेशी पाहुणे विविध जंगल परिसरात तसेच पाणवठय़ावर मुक्कामाला आहेत. हिवाळ्याच्या प्रारंभापासून देश-विदेशातून भारतात स्थलांतर करून येणारे पाहुणे पक्षी परिसरातील जंगलामध्ये व धरणावर दिसू लागतात. यामध्ये युरोपमधून व उत्तरेकडील मंगोलिया, सायबेरिया, रशिया, चीन, तिबेट आदी देशांमधून येणारे बदक, दलदलीतील वेडर्स यांची संख्या मोठी असते. सध्या बुलडाणा परिसरातील येळगाव धरण परिसरात उलीनेक स्टॉक (पांढर्‍या मानेचा करकोचा), तसेच बोथा येथील जंगलात युरोपीयन रोलरचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक पक्षप्रेमी येळगाव धरणावर धाव घेत आहेत. येणार्‍या काळात बुलडाणा जिल्ह्यातील विविध जंगल तसेच विविध पाणवठा परिसरात अनेक परदेशी पक्षी मुक्कामाला राहणार आहेत. त्यात उलीनेक स्टॉक (पांढर्‍या मानेचा करकोचा), कॉपरस्मिथ बॉरबेट (तांबट), रेडनॅप इबिस ( कुदळ्या ), फ्लेम बॅक ( सोनपाठी सुतार), इंडियन रोलर (निलपंख), व्हाईट वॅगटेल (परिट ), पॅटेंट स्टॉर्क (चित्रबलाक रंगित करकोचा), स्पुनबिल स्टार्क (चमचा करकोचा ) यांचा समावेश राहणार आहे. याशिवाय स्थलांतराचा काळ न घालविणारा व फक्त प्रवासादरम्यान दिसणारा युरोपीयन रोलर (विदेशी निलपंख) बुलडाणा जिल्ह्यातील बोथ्याच्या जंगलात थांबलेला आहे. हिमालयातून युरोप व द. आफ्रिकेमध्ये विणीसाठी स्थलांतर करून जाणारा हा पक्षी यावेळी तेथून मोठे झालेल्या िपल्लांना घेऊन हिमालयाकडे परतीच्या प्रवासास निघतो व ऑक्टोबरदरम्यान काही काळ तो बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भामध्ये आढळून येतो, अशी माहिती पक्षमित्र अक्षय जोशी यांनी दिली. *येळगाव परिसरात पांढरा करकोचाबुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव येथील स्व.भोंडे सरकार जलाशय परिसरात यावर्षी पांढर्‍या मानेचा करकोचाचे आगमन झालेले आहे. बोथा येथे युरोपीयन रोलरचे आगमन झालेले असून, डोगगाव येथील पक्षमित्र डॉ. चराटे यांनी त्यांची नोंद घेतली आहे.