शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
3
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
4
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
5
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
6
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
7
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
8
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
9
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
10
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
11
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
12
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
13
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
14
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
15
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
16
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
17
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
18
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
19
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
20
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसटी व लक्झारीची धडक; सात प्रवासी जखमी

By admin | Updated: June 7, 2014 00:17 IST

अकोला येथून खामगावकडे जाणार्‍या एसटीची लक्झरीला धडक; सात प्रवासी जखमी

खामगाव : अकोला येथून खामगावकडे जाणार्‍या एसटीची समोरून येणार्‍या लक्झरीला समोरासमोर धडक झाल्याने सात प्रवासी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास घडली. अपघा तग्रस्त एसटीला पाठीमागून येणार्‍या ट्रकने धडक दिली. प्राप्त माहितीनुसार अकोला आगाराची बस क्र. एमएच४0- वाय ५११२ ही एसटी औरंगाबादकडे सकाळीच निघाली. दरम्यान, खामगावनजीकच्या कोलोरी- िपंप्राळा शिवारात समोरुन येणार्‍या वाहन क्र जीजे १९- व्ही ९३९३ क्रमांकाच्या लक्झरीशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी व लक्झरीच्या समोरच्या भागाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर डिगांबर आखतकर, शरद कुळकर्णी, सीताराम वडापल्ली, सीमा इंगोले, महादेव बोराडे, धनंजय मंगळे, जगन्नाथ मंगळे हे सात प्रवासी जखमी झाले. जखमींना त्वरित खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. अ पघातग्रस्त उभ्या एसटीला पाठीमागून येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने एसटीतील प्रवासी जखमी झाल्याची माहि ती आहे. अपघातात एसटी चालक गजानन सातपुते जखमी झाला आहे. झालेल्या अपघाताची लक्झरीचा चालक साबीरशा बशीरशा फकीर (वय ३0) याने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला एसटीचा चालक गजानन शिवाजी सातपुते रा. अकोला यांच्या नावे तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी एसटी चालक गजानन सातपुते विरुद्ध कलम २७९, ३३७, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जखमींना तातडीची पाच हजारांची मदत
एसटी व लक्झरीचा अपघात होऊन सात जण जखमी झाल्याची घटना घडताच खामगाव आगार व्यवस्थापक सुभाष पाटील, स्थानकप्रमुख जे. व्ही. बोरले, आशीष लकडे यांनी जखमींची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून डिगांबर आखतकर, शरद कुळकर्णी, सीताराम वडीपल्ली यांना प्रत्येकी १ हजाराची तर सीमा इंगोले, महादेव बोराडे, धनंजय मंगळे, जगन्नाथ मंगळे यांना प्रत्येकी ५00 रुपयांची मदत दिली.