शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 02:14 IST

बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक; भाजपची संख्याबळाची जुळवाजुळव

खामगाव, दि. १९- जिल्ह्याचे 'मिनी मंत्रालय' असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असतानाच, जिल्हा परिषदेत शिवसेना भाजपशी युती करण्यास अनुकूल नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या साथीने जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलणार असल्याचे संकेत आहेत.जिल्हा परिषदेमध्ये २४ जागांसह भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. दरम्यान, जि.प. निवडणुकीत शिवसेना- भाजप उमेदवारांनी एकमेकांना आव्हान देत, सामना चुरशीचा केला. याच निवडणुकीत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुत्राला भाजप उमेदवाराकडून पराभवाचे तोंड पहावे लागले. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळेच भाजपशी हात मिळवणी करण्यास शिवसेना अनुकूल नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या ह्यझुलवतह्ण ठेवण्याच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करीत, भाजपाने राष्ट्रवादीशी ह्यघरोबाह्ण करीत संख्याबळाची जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपची ही खेळी यशस्वी झाल्यास, राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या साथीने जिल्हा परिषदेवर ह्यकमळह्ण फुलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळीही यशस्वी होणार आहे. दरम्यान, हातची आलेली ह्यसत्ताह्ण दूर जात असल्याने, शिवसेनेच्या जि.प. सदस्यांचा जीव टांगणीला लागला असून, खात्रीलायक माहितीनुसार, शिवसेना आमदारांसह, जिल्हा परिषद सदस्यांचीही भाजपशी हातमिळवणी करण्यास अनुकूलता असल्याची माहिती आहे; मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून पुत्राचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने, खासदार जाधव यांनी भाजप-सेना युतीबाबत अनास्था दाखविल्याचीही कुजबूज जिल्ह्यातील राजकीय वतरुळात होत आहे. मंगळवारी होणार निवड!जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्वच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांना प्रशासनाच्यावतीने नोटिस पाठविण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी १0 वाजेपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष कोणाचे सहकार्य घेणार, हे जाहीर होण्याची शक्यता आहे.भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक!जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुप्त बैठक खामगाव येथे पार पडली. राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे, खामगाव विधानसभा मतदार संघाचे आ. अँड. आकाश फुंडकर, मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे या बैठकीला उपस्थित होते. शहरातील एका प्रसिद्ध ह्यटॉॅवरह्ण मध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन्याची व्यूहरचना रात्री उशिरापर्यंत सुरू होती.उपाध्यक्ष पदासह एक सभापतीपद देण्याची तयारी!जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी सहकार्य करणार्‍या राजकीय पक्षाला जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासोबतच एक सभापतीपद देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाची आहे. खात्रीलायक माहितीनुसार, भाजपकडून सत्तेच्या पदांची वाटणीही पूर्ण करण्यात आली असून, आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र आहे. उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपदानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांसह तीन सभापतीपदे भारतीय जनता पक्षाकडे राहणार असल्याची ह्यवाटणीह्ण पूर्ण झाली आहे.जि.प.अध्यक्षपदी जयश्री टिकार!जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी घाटाखालील जयश्री विनोद टिकार यांची अपेक्षेप्रमाणे वर्णी लागणार असल्याचे संकेत आहेत. त्याचवेळी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मनमिलाफ झाल्यास, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिनकर देशमुख यांची वर्णी लागणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सत्ता स्थापन्यासाठी हालचाली सुरू आहेत. तथापि, अद्यापपर्यंत कोणताही तोडगा यावर निघाला नसून, सोमवारी सायंकाळपर्यंत सत्ता स्थापन्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सत्ता स्थापन्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे.- भाऊसाहेब फुंडकरपालकमंत्री तथा पक्षनिरीक्षक, भाजप, बुलडाणा.