संग्रामपूरचा सुपुत्र बनला ब-हानपूरचा महापौर

By Admin | Updated: December 5, 2014 00:21 IST2014-12-05T00:21:57+5:302014-12-05T00:21:57+5:30

४0 वर्षांपासून व्यवसायासाठी स्थायिक.

The son of Sangrampur became the son of B-Hanpur | संग्रामपूरचा सुपुत्र बनला ब-हानपूरचा महापौर

संग्रामपूरचा सुपुत्र बनला ब-हानपूरचा महापौर

पंजाबराव ठाकरे / संग्रामपूर (बुलडाणा)
व्यवसायाच्या शोधार्थ ४0 वर्षांपूर्वी महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशात स्थायिक झालेला मराठी माणूस महापौर पदाचा मानकरी ठरला आहे. विशेष म्हणजे हा बहुमान संग्रामपूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्याला मिळाला आहे.
अकोली ता. संग्रामपूर येथील अनिल भोसले हे ४0 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील बुर्‍हानपूर येथे मामाच्या आश्रयाने रोजगारासाठी गेले आहेत. अकोली येथे ३ एकर जमिनीमध्ये दोघा भावांचा चरितार्थ चालणार नाही हे ओळखून त्यांनी बुर्‍हानपूरची निवड केली. तेथे बसस्टॅण्ड परिसरात भोजनालयाचा व्यवसाय सुरू केला. भोजनालय चालवितानाच भोसले तेथील सर्वसामान्य जनतेमध्ये चांगलेच मिसळले. तेथील लोकांच्या सुखदु:खात धावून जाणारे भोसले हे अल्पावधीतच लोकप्रिय झाले व व भाजपामध्ये कार्यरत झाले.
भोसले यांनी भारतीय जनता पक्षाकडून बुर्‍हाणपूर नगरपालिकेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते विजयी झाले व त्यांची ४ डिसेंबर रोजी बुर्‍हाणपूर (एम.पी.) च्या महापौरपदी निवड करण्यात आली आहे.
अनिल भोसले यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळविला. त्यांच्या प्रचारासाठी अकोली येथून काही नागरिक बुर्‍हाणपूर येथे आठ दिवस होते. ४ डिसेंबर रोजी भोसले यांची महापौर पदासाठी निवड करण्यात आल्याने अकोलीमधील नागरिकांमध्येही उत्साही वातावरण दिसून येत होते. अकोलीचे नीलेश सोळंके यांनी सांगितले की आमच्या गावातील सुपुत्र व सर्वसाधारण कुटुंबातील एक मराठी माणूस मध्यप्रदेशसारख्या राज्यात महापौर झाला याचा ग्रामस्थांना अभिमान वाटत आहे.

Web Title: The son of Sangrampur became the son of B-Hanpur