धनादेश अनादरप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

By Admin | Updated: June 21, 2014 00:00 IST2014-06-20T22:56:12+5:302014-06-21T00:00:54+5:30

धनादेश वटवला न गेल्यामुळे आरोपीस सहा महिन्यांचा कारावास.

Six months imprisonment for defamation of check | धनादेश अनादरप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

धनादेश अनादरप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

धाड : हार्डवेअर दुकानातून उधारीवर नेलेल्या मालाची परतावा म्हणून दिलेल्या अँक्सीस बँकेचा धनादेश वटवला न गेल्यामुळे आरोपी दत्तात्रय काशिनाथ लव्हाळे रा.सव ता.बुलडाणा यास सहा महिने कारावासची शिक्षा बुलडाणा येथील न्यायालयाने सुनावली. धनादेशाची रक्कम ४ लक्ष ९९ हजार तीन महिन्याच्या आत फिर्यादीस देण्याचा आदेश पारित केला आहे.
हरिदास गंगाराम गोरे यांच्या धाड येथील गजानन हार्डवेअरमधून आरोपी राजेश ऊर्फ दत्तात्रय लव्हाळे रा.सव यांनी उधारीवर ७0 क्विंटल लोखंड किंमत २,४२,५५0 व एक हजार बॅग सिमेंट किंमत २,५६,५00 असा एकूण ४,९९,0५0 रु.चा माल उधारीवर नेला होता. या मालाची रक्कम लवकरच परत करण्याच्या आश्‍वासनावर हरिदास गोरे यांना १ जुलै २0११ रोजीचा ४,९९,0५0 रु.चा अँक्सीस बँकेचा धनादेश दिला. सदर धनादेश वटविण्यास टाकला असता तो परत आल्याने हरिदास गोरे यांनी नोटीसीद्वारे धनादेशाची रक्कम मागितली; परंतु आरोपी लव्हाळे यांनी रक्कम आणून दिली नाही त्यामुळे आरोपी विरुद्ध प्रकरण न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरण न्यायदंडाधिकारी एस.एम.तामगाडगे यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. प्रकरणात साक्ष पुरावे तपासून धनादेश अनादरप्रकरणी लव्हाळे यास दोषी ठरवून सहा महिने साधी कैदेची शिक्षा व धनादेशाची रक्कम ४,९९,0५0 हरिदास गोरे यांना तीन महिन्यात देण्याचा आदेश दिला. धनादेशाची रक्कम न दिल्यास आणखी ४५ दिवसाची शिक्षा असा आदेश पारित केला आहे. या प्रकरणात हरिदास गोरे यांच्यावतीने अँड.राजेश काशिकर यांनी काम पाहिले.

Web Title: Six months imprisonment for defamation of check