शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराला ‘सिद्धीविनायक’ची मदत

By admin | Updated: April 2, 2015 01:57 IST

प्रत्येक जिल्ह्याला एक कोटीचा निधी; ४ एप्रिलपर्यंत वाटपही करणार.

बुलडाणा : मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने शासनाच्या विविध उपक्रमात नेहमीच सहभाग नोंदवित सामाजिक उत्तरदायीत्व जपले असून, आता जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येकी एक कोटीचा निधी देणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार बुलडाणा जिल्ह्याला एक कोटीचा निधी शनिवारी मिळणार असल्याची माहिती बुधवारी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना दिली. सध्या राज्यभर जलयुक्त शिवार अभियानाकडे शासन प्राधान्याने लक्ष देत असून, या अभियानात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी अर्थात सामाजिक उत्तरदायीत्व कायदा अंतर्गत विविध संस्था, उद्योग, सामाजिक संघटना व कंपन्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार तसेच या कामासाठी मंत्रालय स्तरावर स्वतंत्र कक्षही स्थापन केला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात मुंबई येथे सर्व जिल्हाधिकारी तसेच सामाजिक संस्था व कंपन्यांचे प्रतिनिधींची बैठक झाली, त्यामध्ये प्रत्येक संस्थेने सामाजिक दायीत्व म्हणून सहभाग घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीत सिद्धीविनायक ट्रस्टच्यावतिने ३४ जिल्हय़ांसाठी प्रत्येकी एक कोटी देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार ट्रस्टच्यावतिने निधी वितरीत करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी अंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात १४ गावांमध्ये दोन हजार ३८७ कामांचे नियोजन असून, अभियानांतर्गत ७७ गावांमध्ये २७८ कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामध्ये १२ ठिकाणी सिमेंट नाला बांध उभारण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कुरूंदकर म्हणाले की, राज्याला दुष्काळाच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी या अभियानांतर्गत सिद्धीविनायक ट्रस्ट प्रमाणे विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.