शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By admin | Updated: June 1, 2017 00:16 IST

पालखी निघाली... पालखी निघाली... भक्तांसंगे गजानन माउली निघाली...!

गजानन कलोरे । लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : ‘‘शेगावीचा राणा माहेरी निघाला। संगे संत मेळा भजनी रंगला।। लक्ष लक्ष कंठातूनी गावूनी अभंग । चंद्रभागा दंग झाली गजानन, गजानन ।। पंढरीत चैतन्याचा मोगरा फुलला ।शेगावीचा राणा माहेरी निघाला।।’’ अशा भक्तिमय गीतांनी भारावलेल्या वातावरणात बुधवारी गजानन महाराजांच्या पालखीने आषाढी यात्रेकरिता पंढरपूरकडे प्रस्थान केले. गज, अश्वासह हजारो भक्तांच्या पायदळ दिंडीसह पालखी सकाळी ७ वाजता मार्गस्थ झाली. यावेळी ‘‘पालखी निघाली...पालखी निघाली... भक्तांसंगे गजानन माउली निघाली...’’ यासह ‘गजानना’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले होते.संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभााऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे व विणेकरी, टाळकरी, वारकऱ्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी संत गजानन महाराज संस्थानमधून प्रकटस्थळमार्गे नागझरीकडे रवाना झाली. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. श्रींच्या पालखीच्या पूजनप्रसंगी विश्वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, अशोक देशमुख, गोविंदराव कलोरे, अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्वेश्वर त्रिकाळ, किशोर टांक, पंकज शितूत, चंदूलाल अग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रकटस्थळावर श्रींची आरती करण्यात आली. यावेळी मधुकर घाटोळ, एम.पी. पाटील, शरद शिंदे यांच्यावतीने वारकऱ्यांना चहा, फराळाचे वितरण करण्यात आले. नागझरी रोडवर अशोक देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना चहा, नाश्ता देण्यात आला. पाचशे वारकऱ्यांचा सहभागश्रींच्या पालखीसह निघालेल्या पायदळ दिंडीत पांढऱ्या शुभ्र गणवेशात सुमारे पाचशे वारकरी सहभागी होऊन शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत आहेत. पालखीसोबत रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.