खामगाव : येथील जिया कॉलनीमधील इन स्टाईल नामक टेलरींगचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडून दुकानातील नगदी रक्कम चोरून दुकानाला आग लावल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये यामध्ये सदर दुकानातील कपडे जळाल्याने १८ हजाराचे नुकसान झाले आहे. स्थानिक जिया कॉलनीमधील रहिवासी मो.फैजुल्ला मो.असदउल्ला (वय ३0) यांचे त्याच भागात इन स्टाईल नामक दुकान आहे. काल एका चोरट्याने त्यांचे दुकान फोडून दुकानातील गल्ल्यात ठेवलेले तीन हजार ५00 रूपये नगद लंपास केले आणि दुकानाला आग लावली. यावेळी दुकानात ठेवलेले अनेक कपडे जळून सुमारे १५ हजाराचे नुकसान झाले आहे. यावेळी मो.फैजुल्ला खान यांनी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध तीन हजार ५00 रुपये नगद लंपास करून नुकसान केल्याची तक्रार दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
चोरी करून दुकानाला आग लावली
By admin | Updated: September 25, 2015 00:08 IST
खामगावातील जिया कॉलनीमधील घटना.
चोरी करून दुकानाला आग लावली
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}