दुकानाला आग

By Admin | Updated: July 3, 2015 23:55 IST2015-07-03T23:55:57+5:302015-07-03T23:55:57+5:30

बुलडाणा येथील आठवडी बाजारातील दुकानास आग; दहा लाखाचे नुकसान.

Shop fire | दुकानाला आग

दुकानाला आग

बुलडाणा : येथील आठवडी बाजारातील नगरपरिषद व्यापारी संकुलात असलेल्या इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही घटना २ जुलैच्या मध्यरात्री घडली. बुलडाणा येथील सुधीर दिनकर देशमुख यांची आठवडी बाजार परिसरात नगरपरिषद व्यापारी संकुलात असलेल्या इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान आहे. २ जुलैच्या मध्यरात्री दुकानातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले आणि अग्निशामक दल व पोलिसांना तत्काळ याची माहिती देण्यात आली. शुक्रवारी पहाटेपर्यंत आग आटोक्यात आली; पंरतु तोपर्यत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात असून, १0 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदार सुधीर देशमुख यांनी दिली. यासंदर्भात पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Shop fire