शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

शेगाव : तूर घोटाळाप्रकरणी चार दलालांना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:59 AM

​​​​​​​शेगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेडमार्फत सुरू असलेल्या केंद्रावर १00 क्विंटलपेक्षा जास्त तूर विक्री करून शासनाची फसवणूक करणार्‍या चौघांना दुपारी अटक केली. 

ठळक मुद्दे५४२ क्विंटल तूर विकून शासनाची फसवणूक   

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेडमार्फत सुरू असलेल्या केंद्रावर १00 क्विंटलपेक्षा जास्त तूर विक्री करून शासनाची फसवणूक करणार्‍या चौघांना दुपारी अटक केली. शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रावर नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू असताना ज्ञानदेव वासुदेव घाटे रा. सांगवा यांनी १२0 क्विंटल, विश्‍वास नरहरी पाटील रा. झाडेगाव एकूण २२२ क्विंटल, बाळकृष्ण सुदामा गव्हाळे रा. झाडेगाव यांनी १00 क्विंटल, ज्ञानेश्‍वर श्रीराम पाटील, रा. झाडेगाव १00 क्विटल अशी एकूण ५४२ क्विंटल तूर गैरमार्गाने विकून २७ लाख ३७ हजार १00 रुपयांनी शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे शाखा बुलडाणा यांच्या चौकशीत निष्पन्न झाले. आरोपींनी त्यांचे अपेक्षित तुरीचे उत्पन्न असताना उत्पन्न जास्तीचे दाखवून खोटे हमीपत्र तूर विक्री  करते वेळी सादर केले. खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक संबधितांनी केली. यासाठी त्यांना बाजार समिती प्रशासनाचे सहकार्य लाभले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ठाणेदार जाधव यांनी शेगाव शहर पो.स्टे ला फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी किसन घाटे, विश्‍वास पाटील, बाळकृष्ण गव्हाळे, ज्ञानेश्‍वर पाटील या चौघांविरुद्ध अप.क्र.२४१/१७ कलम ४२0,४0९,४६५,४६८,४७१,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करून अटक केली. पुढील चौकशीसाठी चारही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आरोपी हे कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव येथे संचालक पदावर असताना त्यांनी त्यांचे अपेक्षित तुरीचे उत्पन्न कमी असताना त्यांनी तुरीचे उत्पन्न जास्तीचे दाखवून खोटे हमीपत्र तूर विक्री करते वेळी सादर केले. आरोपी यांनी खोटे व बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक केली असल्याची फिर्याद यापूर्वीच शेगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे.  या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

बाजार समिती संचालकही दोषी!या अगोदरसुद्धा  बाजार समिती संचालक श्रीधर पाटील व नीलेश राठी, जगदीश राठी या व्यापार्‍यांनी २ ते २४  जानेवारी २0१७ दरम्यान गैरमार्गाने तूर विकून २६ लाख १५ हजार ९00 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावMarket Yardमार्केट यार्ड