शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात विविध अपघातात सात ठार

By admin | Updated: March 9, 2015 01:55 IST

७ व ८ मार्च रोजी झालेल्या तीन अपघातात एकूण सात व्यक्ती ठार

बुलडाणा : जिल्ह्यात ७ व ८ मार्च रोजी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण सात व्यक्ती ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये चिखली-मेरा फाट्यादरम्यान ३ ठार, मेहकर- हिवराआश्रम रस्त्यावर २ ठार, तर शेगाव-खामगाव रस्त्यावरील चिंचोली फाट्याजवळ २ व्यक्ती ठार झाल्या आहेत. चिखली-मेरा फाट्याजवळील रामनगर फाट्याजवळ लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणारा ४0७ समोर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त इंडिकावर आदळून उलटला. त्यामुळे मेटॅडोरमधून रस्त्यावर पडलेल्या वर्‍हाडां पैकी तिघांना पाठीमागून येणार्‍या ट्रकने चिरडल्याची घटना ७ मार्च रोजी रात्री १0 वाजता घडली. सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव येथील प्रल्हाद गरड यांच्या मुलाचे लग्न बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे होते. लग्न समारंभ झाल्यानंतर वर्‍हाड मेटॅडोर ४0७ क्रमांक एम.एच.२८ एच.६५८६ ने खैराव येथे येत असताना चिखली ते मेरा फाट्यादरम्यान रामनगर फाट्याजवळील उतारावर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त इंडिकावर मेटॅडोर ४0७ आदळल्याने अपघात झाला. यावेळी मेटॅडोरमधून रस् त्यावर पडलेल्या तिघांना पाठीमागून येणार्‍या ट्रक क्रमांक एच.आर.५५ जी. 0३४६ ने चिरडले. त्यामुळे संतोष विठ्ठल तळेकर (वय ३५), दमोदर त्र्यंबक तळेकर (वय ५0), श्रीकृष्ण प्रकाश गरड (वय २२) रा. खैरव तळेकर हे जागीच ठार झाले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या घटनेत मेहकर ते हिवरा आश्रम रस्त्यावरील चांगाडीच्या पुलावर दुचाकीला समोरून येणार्‍या मिनीबसने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागेवरच ठार झाल्याची घटना ८ मार्च रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. मेहकर येथील मिलिंद नगरातील यादवराव दगडुजी मुळे (५५) व तालुक्या तील बाभुळखेड येथील कमळाजी बाबुराव गायकवाड (४५) हे दोघे जण एम.एच.२८ डब्ल्यू. १६९८ क्रमांकाच्या मोटारसायकलने मेहकरकडून बाभुळखेडला जात होते. दरम्यान, चिखलीवरून मेहकरला येत असलेल्या मेहकर आगाराच्या 0६ एस. ७८९५ क्रमांकाच्या मिनीबसने चांगाडीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील यादवराव मुळे व कमळाजी गायकवाड हे जागेवरच ठार झाले. याप्रकरणी सुरेश नामदेव खवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिनी बस चालक मारोती कुंडलीक झनक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.