शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अनुराधा फार्मसीत फार्मा उद्योगात विदेशातील संधी विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST

चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, फार्मा उद्योगांतर्गत विदेशामध्ये उपलब्ध असलेल्या संधी या ...

चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, फार्मा उद्योगांतर्गत विदेशामध्ये उपलब्ध असलेल्या संधी या विषयावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा असोसिएट डायरेक्टर, बानेर हेल्थ केअर, अमेरिका येथील डॉ. हर्षल हरलालका यांचे ऑनलाइन पद्धतीने चर्चासत्र ८ एप्रिल रोजी पार पडले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांनी प्रास्ताविकात अनुराधा फार्मसी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विदेशात उच्चपदावर कार्यरत असल्याची माहिती देऊन पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विदेशातील उच्च शिक्षणसाठी स्पर्धा परीक्षा, फार्मा उद्योगातील रोजगाराच्या संधी या विषयीची माहिती मिळावी, या उद्देशाने संस्थेचे सचिव राहुल बोंद्रे यांच्या कल्पनेतून सदर वेबिनारचे आयोजन केले आल्याचे सांगितले, तर डॉ. हर्षल हरलालका यांनी भारतातील फार्मसी पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विदेशामध्ये फार्मसी क्षेत्रातील डी.फार्म, एम. एस. फार्मसी पदव्युत्तर पदवी यासारख्या अभ्यासक्रमास प्रवेशासाठीच्या स्पर्धा परीक्षा, त्यांची तयारी, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फार्म डी, पीच.डी., एम. एस. फार्मसी यांसारख्या अभ्यासक्रमास निवड झाल्यानंतर, अमेरिकन विद्यापीठामध्ये शिक्षण आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. या चर्चासत्राला प्राचार्य डॉ. बियाणी, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे, प्राचार्य डॉ. आर. आर. पागोरे, डॉ. उप्पला मोहन कुमार, प्रा. पवन फोलाने, प्रा. एस. एस. कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने याचा लाभ घेतला. आभार ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. यू. एम. जोशी यांनी मानले.