शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील दारूची शेगावात विक्री

By admin | Updated: April 21, 2017 23:45 IST

मध्य प्रदेशातील दारू महाराष्ट्रात विकण्यावर बंदी

फहीम देशमुख शेगाव: राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील ५00 मीटरच्या आत मद्य विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध दारूची विक्री वाढली असतानाच, मध्य प्रदेशातील प्रतिबंधित दारू चोरट्या मार्गाने शेगाव आणि परिसरात विक्रीसाठी आणली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुधवारी शेगावात मध्य प्रदेशातील प्रतिबंधित दारूची एक मोठी खेप उतरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ट्रकभर उतरलेला साठा पाहता दारूबंदी विभाग झोपेत असल्याचे दिसून येत आहे.शरीराला अपायकारक असल्यामुळे मध्य प्रदेशातील दारू महाराष्ट्रात विकण्यावर बंदी आहे. तरीसुद्धा दारूच्या धंद्यात गुंतलेले काही जण मध्य प्रदेशातील ही प्रतिबंधित दारू विदर्भात आणतात. वेगवेगळ्या ह्यब्रॅण्डेडह्ण मद्याच्या रिकाम्या बाटल्यात विशिष्ट ह्यमिश्रणह्ण करून ही दारू भरली जाते. ती काही मद्यविक्रेत्यांना हाताशी धरून ही मंडळी मद्यपींना विकून त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जातो. दुसरीकडे ही प्रतिबंधित दारू विकल्या जात असल्याने राज्य शासनाचाही महिन्याचा कोट्यवधीचा महसूल बुडतो. यामध्ये बुधवारी शेगाव शहरात मध्य प्रदेशातील ह्यब्रॅण्डेडह्ण दारूचाच मोठा साठा शेगाव शहरात उतरविण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील ५00 मीटरच्या आत मद्य विक्री बंद करण्यात आली, यात शेगावातील सर्वच बीअर बार आणि काही दारूची दुकाने बंद करण्यात आली. आता शहरात फक्त दोन देशी-विदेशी दारूची दुकाने सुरू असल्याने मद्यपींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण पाहता अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांसह काही नवखे या व्यवसायात उतरल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच शेगावच्या एका राजकारणी महिलेच्या सुपुत्रास अवैधरीत्या दारूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे दारूची वाहतूक करण्यासाठी स्कर्पिओ गाडीचा उपयोग करण्यात आला. यावरून या व्यवसायाकडे आता अनेकजण आकर्षिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यात बुधवारी शेगावात मध्य प्रदेशातील प्रतिबंधित दारूची एक मोठी खेप उतरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ट्रकभर उतरलेला साठा दोन तासातच शहरात वितरित करण्यात आलो.