शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना मिळणार पाणी शुद्धीकरण यंत्र

By admin | Updated: July 26, 2014 22:54 IST

सर्वशिक्षा अभियान : जिल्ह्याला ४८७ पाणी शुद्धीकरण यंत्र प्राप्त

खामगाव: सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पाणी शुध्दीकरण यंत्र (वॉटर फिल्टर कम प्युरीफायर) मिळणार आहेत. जिल्ह्यातील तेराही तालुक्याला एकुण ४८७ पाणी शुध्दीकरण यंत्र प्राप्त झाले असून सद्यास्थितीत शाळास्तरावर वाटप सुरू आहे. खामगाव तालुक्यात ५६ शाळांना याचा लाभ मिळणार आहे. ह्यसारे शिकु या सारे पुढे जाऊ याह्ण या हेतूने विद्यार्थ्यांचा प्राथमिक शाळेतच सर्वांगीण विकास व्हावा तसेच शाळेच्या भौतिक सुविधा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुसज्ज शाळा खोल्या, मोफत पाठय़पुस्तके, मोफत गणवेश, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती तसेच प्रोत्साहन भत्ता विद्यार्थ्यांना दिला जातो. बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हमीच शासनाने घेतली आहे. बालवयात एकही विद्यार्थी शाळेपासून वंचीत राहू नये म्हणून शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा याकरीता शिक्षण विभागाकडून प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना पाणी शुध्दीकरण यंत्र देण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ५0 लिटर पाणी क्षमता असलेले २८0 तर २५ लिटर पाणी क्षमता असणारे २0७ जलशुध्दीकरण यंत्र मिळाले आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील ५६ शाळांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.