शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला संजीवनी

By admin | Updated: November 6, 2014 23:23 IST

केंद्र सरकारच्या घोषणेचे स्वागत : ठेवीदारांसह शेतक-यांना अच्छे दिन येण्याची आशा.

राजेश शेगोकार / बुलडाणाबुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला मदत देण्याबाबत केंद्र सरकारने घोषणा केल्यामुळे या बँकेला संजीवनी मिळाली आहे. बँक अडचणीत आल्यापासून ठेवींचे मिळणे दुरापास्त झाले असून, आता ठेवीदारांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. अडचणीत आलेल्या बुलडाणा जिल्हा बँकेला १६ मे २0१२ रोजी रिझर्व्ह बँकेने ३५ (ए) ची नोटीस देऊन ठेवी स्वीकारण्यास परवानगी नाकारल्यानंतर जिल्हा बँकेतील गैरप्रकाराची लक्तरे टांगल्या गेली. ठेवीदारांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली व ठेवी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. एकीकडे ठेवी स्वीकारायच्या नाहीत तर दुसरीकडे ठेवी देणे भाग आहे, अशा कात्रीत सापडलेल्या संचालक मंडळाला पुढे बँक सावरता आली नाही अन् राज्यसरकारनेही मदतीचे गाजर दाखवित झुलवित ठेवले अखेर संचालक मंडळाने राजीनामा दिल्यानंतर या बँकेवर सहकार विभागाने प्राधीकृत अधिकार्‍यांची १८ सप्टेंबर २0१३ रोजी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर प्राधिकृत अधिकार्‍यांनी बँकेचा एनपीए कमी करून वसुलीवर भर देत असतानाच ९ मे २0१४ रोजी जिल्हा बँकेचा बँकींग परवाना रद्द करण्याचा रिझर्व्ह बँकेचा आदेश धडकला. या आदेशामुळे बँकेच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग थांबला होता, त्यामुळे प्राधिकृत मंडळाने १९ मे २0१४ रोजी रिझर्व्ह बँकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान रिझर्व्ह बँकेला आपले म्हणणे सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यानुसार ३0 मे २0१४ रोजी पुन्हा सुनावणी झाली असता रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. या आदेशामुळे बँकेच्या पुनरूज्जीवनाची आशा पल्लवीत झाली होती; मात्र या आदेशाविरोधात रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २५ जुलै २0१४ रोजी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा हायकोर्टाचा आदेश जैसे थे ठेवला. त्यामुळे बँकेपुढे परवाना मिळविणे हेच प्राधान्य आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे ते शक्य असून, बँकींग परवाना येत्या तीन महिन्यापर्यंत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.