शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल खोळंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 10:59 IST

Schlorship Exam सात महिन्यांनतरही हा निकाल लावण्यात परीक्षा परिषदेला यश आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी इयत्ता पाचवी आणि आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल सप्टेंबर मध्ये लावण्याची घोषणा परीक्षा परीक्षा परिषदेने केली होती. मात्र, सात महिन्यांनतरही हा निकाल लावण्यात परीक्षा परिषदेला यश आलेले नाही. पेपेरमध्येही मोठ्या प्रमाणात चुका आढळून आल्या होत्या. जिल्ह्यातील  विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रावर शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील इयत्ता पाचवीच्या १५ हजार २१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी पहिला पेपर १४ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी दिला होता. तसेच पेपर क्र.२ साठी १४ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तसेच इयत्ता आठवीच्या पहिल्या पेपरसाठी १२ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरले होते. त्यापैकी १२ हजार ३२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तसेच दुसऱ्या पेपरसाठी १२ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी आवेनदनपत्र भरले होते. त्यापैकी १२ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.मार्च महिन्यात कोरोना संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन वाढला. त्यामुळे, परीक्षेचा निकालही खोळंबल्याचे चित्र आहे. राज्यभरातील १० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. निकाल केव्हा लागणार याविषयी घोषणा झालेली नाही.निकाल जाहीर करण्याची मागणीराज्यभरात अन्य स्पर्धा परीक्षा उशीरा होउनही त्यांचे निकाल जाहीर झाले आहे. मात्र, राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाScholarshipशिष्यवृत्ती