शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्तारोको

By admin | Updated: August 14, 2014 23:48 IST

बुलडाणा जिल्ह्यात ६१८ आंदोलनकर्ते स्थानबद्ध

बुलडाणा : राज्य घटनेमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिले असताना महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या समाजाला आपल्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले. घटनेने दिलेला अनुसूचित जातीच्या सवलतीचा अधिकार विनाविलंब धनगर समाजाला देण्यात यावा, या मागणीसाठी धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने आज जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये ६१८ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. बुलडाणा येथे चिखली मार्गावर रामभाऊ जुमडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आले.शेगाव : येथे यशवंतदादा बुरुंगले यांच्या नेतृत्वाखाली शेगाव-आकोट रोडवर रास्तारोको करण्यात आला. यावेळी अशोक देवकते, केशव हजारे, संतोष पिंगळे, मंगेश करे, जनदीन बोरसे, उत्तम बोरसे, रामरतन पटोकार, महादेव पालवे, राजेंद्र गोरे, चंद्रकांत माने, संतोष माने, रवि काळे, मनोज माने, मधुकर मासाळ, नामदेव माने, हनुमान बुरुंगले, काका सोलनकर यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.चिखली : चिखली येथील जिल्हा सहकारी बँकेजवळील चौकात जिल्हाध्यक्ष विजय खरात यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, विजय खरात, संजय पांढरे, दिलीप गवारे, रमेश देढे, भानुदास गवारे, गजानन कळंगे, आकाश गवारे आदी समाजबांधवांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.मेहकर : येथील मुख्य महामार्गावर धनगर समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये संदीप गायकवाड, विजेंद्र पाझडे, प्रल्हाद गोरे, एकनाथ खराट, पप्पु गायकवाड, पांडुरंग घाटोळ, गजानन कातडे, योगेश फुके, गजानन पातळे, रामप्रसाद खोडवे, सुरेश औदगे, दत्तात्रय खराट, संतोष गोरे, वैभव नव्हाळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते. मोताळा : येथील मुख्य मार्गावर धनगर सामाज बांधवांनी रास्तारोको केले. या आंदोलनात पारंपरिक पोशाखासह शेकडो महिला व पुरूष मुलाबाळांसह सहभागी झाले होते. जिल्हा अध्यक्ष रामेश्‍वर काळंगे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाले. यावेळी हरिभाऊ कर्नर, नानाभाऊ शिंदे, काशीराम बिचकुले, रामा शिंगाडे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.मलकापूर : येथील सोलापूर-मलकापूर या राज्य महामार्गावर व तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात अनिल पाचपोळ, चंद्रकांत कवळे, मधुकर फासे, विनय काळे, निनाजी बोरसे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.संग्रामपूर : येथील वरवट बकाल बसथांब्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यात ३५ जणांना तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, एक तास वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात चंदाताई पुंडे, भारत वाघ, रमेश इलामे सहभागी झाले होते.