शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकादेवी वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: April 2, 2015 01:54 IST

चिखली येथे चैत्र पौर्णिमेला निघणार वहन मिरवणूक.

चिखली (जि. बुलडाणा): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी यात्रा महोत्सव दरवर्षाप्रमाणे यावर्षी चैत्रपौर्णिमा ४ एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने शहरात सर्वत्र उत्साह व भक्तीमय वातावरण पाहावयास मिळत आहे. यानुषंगाने ङ्म्री रेणुकादेवी संस्थान व ङ्म्री बचानंद स्वामी संस्थानच्यावतीने वासंतिक नवरात्रोत्सवास सुरूवात झाली असून, सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेली रेणुका देवी वहन मिरवणुकीची आस भाविकांना लागली आहे. दरवर्षी मोठय़ा उत्साहात भरणार्‍या या यात्रेचे आकर्षण तालुक्यासह परिसरातील गावखेड्यांनाही असते. रेणुकादेवीचे मंदिर हे शहराच्या मध्यभागी असून, मंदिराचा उंच कळस शहराच्या वैभवात भर घालून देतो. पौराणिक काळापासून रेणुकादेवीचे मूळस्थान चिखली हे असून, आदिशक्तीचे सर्वश्रेष्ठ शक्तीपीठ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. महान तपस्वी बचानंद महाराज यांच्यानंतर त्यांच्या शिष्यानीही मंदिराचे काम पाहिले. कालांतराने मंदिराच्या व्यवस्थापनासाठी विश्‍वस्त मंडळाची नेमणूक झाली. तेव्हापासून अविरतपणे विश्‍वस्त मंडळामार्फत दरवर्षी वासंतिक नवरात्रोत्सवानिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यानुषंगाने रेणुका देवी मंदिरात घटस्थापना झाली असून दररोज भजन, आरती, गीतापठण सुरू आहे, तसेच सकाळ, संध्याकाळ आरती, नामस्मरण आदी कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात पार पडत आहेत. ३ एप्रिलच्या सायंकाळी गळकरी, वगदी पूजन, झेंडा मिरवणूक, भंदे मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर चैत्रपौर्णिमा ४ एप्रिल रोजी रेणुकादेवीला प्रात:काळी अभिषेक व नवरात्र उत्थापन, शेलुदवासीयांचे मानाचे पातळ, खण, गळकरी वगदी प्रदक्षिणा, नवसपूर्ती झेंडा मिरवणूक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बियाणे महामंडळ, बाजार समिती, अड त, हमाल, एस.टी.आगार आदी संघटनांच्यावतीने झेंडा मिरवणुकीसह खण पातळ अर्पण, वाहनावरील देवीला पातळ व खण अर्पण, चर्मकार बंधू-भगिनींची चित्तथरारक जिव्हा त्रिशुलधारी मिरवणुकीसह नवसपूर्ती व दिवसभर शहरातील विविध पतसंस्था, बँक, मित्रमंडळ, गणेश मंडळ, व्यापारी संघटनांकडून ठिकठिकाणी प्रसादाचे वितरण तर रात्री या यात्रेचे मुख्य आकर्षण आई रेणुकादेवीच्या अष्टभूजा प्रतिमेची भव्य (वहन) मिरवणूक निघणार आहे.