'रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योग्यच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:50 IST2019-01-20T13:44:31+5:302019-01-20T13:50:08+5:30

राज्यभर निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी रात्री मलकापूरात दाखल झाले होते. त्यावेळी रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्यच असल्याची माहिती स्थानीय पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवार यांना दिली.

Raver Lok Sabha Constituency is Right for NCP | 'रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योग्यच'

'रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योग्यच'

हनुमान जगताप 
मलकापूर: राज्यभर निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी रात्री मलकापूरात दाखल झाले होते. त्यावेळी रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्यच असल्याची माहिती स्थानीय पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवार यांना दिली. निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शनिवारी रात्री जि.प.उपाध्यक्ष मंगलाताई रायपूरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी थांबले होते. त्यावेळी मलकापूर विधानसभा मतदार संघातील मतदाराविषयी प्रश्न उपस्थित केला असता,रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योग्यच असल्याची माहिती पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवारांना दिली.

रावेर लोकसभा मतदारसंघात निश्चितच काँग्रेस पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद शिवाय आहे. राज्यात युतीच्या धरतीवर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आघाडी धर्म पाळण्यासंबंधी आपण सांगावे, अशी विनंती संतोष रायपूरे यांनी अजित पवार यांना केली.
चहापानानंतर अजित पवार व जयंतराव पाटील यांनी रामवाडी परिसरात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते जाणून घेतली. त्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हिताचा असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.  

Web Title: Raver Lok Sabha Constituency is Right for NCP