शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राणे, भुजबळ, पवारांना वठणीवर आणू : कदम

By admin | Updated: July 24, 2014 02:09 IST

बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेचा मेळावा संपन्न

बुलडाणा : राज्यात दहा हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. सिंचनाची कामे झाली नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला. गेल्या पंधरा वर्षांमध्ये विविध घोटाळे करून आघाडी सरकारने राज्याला पन्नास वर्षे मागे नेले आहे. आता फक्त दोन महिने थांबा.. एकदा युतीचे सरकार आले की, नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासह अजित पवारांचेही घोटाळे चव्हाट्यावर आणून, त्यांना वठणीवर आणू, अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी आघाडी सरकारच्या नेत्यांचा समाचार घेतला. भगव्या सप्ताहानिमित्त बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. आघाडी सरकारने पंधरा वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले; मात्र या राज्याला प्रगतीपथावर नेण्याऐवजी अधोगतीकडे नेले. महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे करून या सरकारने जनतेच्या पैशावर डल्ला मारला. या सरकारला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप त्यांनी केला.