शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरावर रानडुकाराचा हल्ला

By admin | Updated: April 23, 2017 01:04 IST

खेर्डा शिवारातील घटना : मजुर जखमी

जळगाव जामोद: तालुक्यातील खेर्डा खुर्द शिवारात शनिवारी दुपारी रानडुकराने शेतात पर्‍हाटी उपटत असलेल्या शेतमजुरावर हल्ला केला. यामध्ये शेतमजूर विश्‍वास दिनकरराव देशमुख (वय ४0) हे जखमी झाले. याबाबत वन विभाग जळगाव जामोद येथे तक्रार देण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालयात शेतमजुरावर उपचार करण्यात आले. खेर्डा खुर्द शिवारात श्री संत गजानन महाराज पोलपोई परिसरात अमोल भीमराव देशमुख यांच्या गट नं.९२ या शेतात शनिवार २२ रोजी सकाळपासून विश्‍वास देशमुख हे पर्‍हाटी उपटण्याचे काम करीत होते. दुपारी १२ च्या दरम्यान, अचानक या शेतात रानडुक्कर आले व त्याने सरळ शेतमजूर विश्‍वास देशमुख यांच्या अंगावर धाव घेतली. त्यांनी रानडुकराला परतून लावण्याचा प्रयत्न केला; परंतु ते यशस्वी झाले नाही. रानडुकराने विश्‍वास देशमुख यांच्या डाव्या पायाच्या गुड्याजवळ मोठी जखम केली. आरडाओरडा झाल्याने इतर मजूर आल्यानंतर रानडुक्कर पसार झाले. विश्‍वासा देशमुख यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केल्यानंतर दहा टाके देण्यात आले. जखम ही अत्यंत खोल असून, देशमुख यांच्या पायातून बराच रक्तस्राव झाल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. याबाबतची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली. जंगलात पाणी नसल्याने हे जंगली प्राणी आता गावाकडे धाव घेत आहे. अमोल देशमुख यांचे शेत हे जळगाव ते वरवट रस्त्याच्या थोडे आत असून, येथे सतत वर्दळ असते. अशाही ठिकाणी रानडुक्कराने शिरकाव करणे हे शेतमजुरांसाठी अत्यंत घातक झाले आहे. सध्या उन्हाची दाहकता जास्त असल्याने पहाटे पाच वाजताच मजूर शेतीच्या कामावर जातात. या घटनेमुळे सर्व मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.