राजू केंद्रे यांचा खासदारांच्याहस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:48+5:302021-07-07T04:42:48+5:30

पिंप्री खंदारे येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याने मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे, तर तुळजापूर ...

Raju Kendra felicitated by MPs | राजू केंद्रे यांचा खासदारांच्याहस्ते सत्कार

राजू केंद्रे यांचा खासदारांच्याहस्ते सत्कार

पिंप्री खंदारे येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याने मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे, तर तुळजापूर येथे ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. यासोबतच राजूने मेळघाट, ग्रामपरिवर्तन, मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय, आयपँक येथे सामाजिक कार्य केले. युवकांसाठी एकलव्य ही चळवळ सुरू आहे. यवतमाळ येथे जवळपास ३० हजार पुस्तकांचे संकलन केले. त्यांना ब्रिटिश सरकारची चेवनिंग ही स्कॉलरशिप मिळाली आहे. त्याबद्दल खासदार प्रतापराव जाधव, राजश्री प्रतापराव जाधव यांनी पिंप्री खंदारे येथे जाऊन राजूचे कौतुक केले.

यावेळी सरपंच कमल चौधर, सुरेश चौधर, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, रोजगार सेवक भास्कर उबाळे, शिवसेना पदाधिकारी राम भालेराव, सोशल मीडिया प्रमुख बाळू जाधव उपस्थित होते.

Web Title: Raju Kendra felicitated by MPs