शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपु-या पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात

By admin | Updated: November 8, 2014 23:53 IST

खामगाव तालुक्यातील परिस्थिती, शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण.

खामगाव (बुलडाणा) : निसर्गाच्या अवकृपेने सद्यस्थितीत तालुक्यातील जलाशय पातळी कमालीची घसरली आहे. तर विहिरींची पाणी पातळी हिवाळ्यातच धीर सोडू पाहत असल्याने यंदाचा रब्बी हंगाम पूर्णत: धोक्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.खामगाव तालुक्यात मन, तोरणा, ज्ञानगंगा, ढोरपगाव व मस या प्रकल्पाबरोबरच इतर लघु प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. यंदा पावसाळ्याअखेर ४५२.७ मी.मी. पावसाची नोंद स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतली आहे. अपुर्‍या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला; परंतु रब्बी हंगामात खरिपातील आर्थिक तूट भरुन काढण्याची संधीही निसर्गाने हिसकावून घेतली. त्यामुळे आगामी काळात रब्बीचे गहू, हरभरा व कांदा पीक घेणे धोक्यात आले आहे. गतवर्षी १00 टक्के पावसाळा झाल्याने सर्वत्र रब्बी व उन्हाळी हंगाम बहरात होता. गहू, हरभरा, भूईमूग व कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले होते; मात्र यावर्षी परिस्थितीने शेतकर्‍यांना आर्थिक संकटात टाकले आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दगा दिला. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली. खरिपाच्या पिकांना लागलेला खर्चही झालेल्या उत्पादनातून निघालेला नसल्याने शेतकरी पार खचला आहे. खरिपाबरोबरच यावर्षी रब्बीचीही हीच अवस्था आहे. प्रकल्पाचे नाव     जलाशय क्षमता   सध्याचा जलसाठा         टक्केवारीमन                       ३८.८३ दलघमी       १९.0२ दलघमी          ५३तोरणा                   ७.९0 दलघमी         १.९१ दलघमी           २0ढोरपगाव               ५.८३ दलघमी         ३.८३ दलघमी            ७८ज्ञानगंगा               ३३.९३ दलघमी        २२.0४ दलघमी          ७0मस                      १५.0४ दलघमी        १३.६४ दलघमी          ९१