शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेला पूर

By admin | Updated: August 6, 2015 00:29 IST

जळगाव, संग्रामपूर मलकापूर तालुक्यांचा संपर्क तुटला.

खामगाव : सोमवारपासून परतलेल्या पावसाने गेल्या ३0 तासांपासून संततधार कायम ठेवल्याने पूण्रेला पूर आला आहे. पुरामुळे संग्रामपूर, जळगाव जामोद व मलकापूर तालुक्यांतील गावांचा संपर्क तुटला असून, काही मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे. खिरोडा तसेच येरळी येथील पुलावरून बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत आठ फूट पाणी वाहत होते, तर संग्रामपूर तालुक्यातील भोन गावाला पुरामुळे वेढा पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जळगाव जामोद तालुक्यात २७0 मि.मी. झाला, त्यापाठोपाठ मलकापूर तालुक्यात १५५ मि.मी. आणि सर्वांत कमी देऊळगावराजा तालुक्यात ७६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बुलडाणा तालुक्यात १६५ मि.मी., चिखली ११८ मि.मी., मेहकर १0९ मि.मी., लोणार १0३ मि.मी., सिंदखेडराजा १४१ मि.मी., मोताळा १४0 मि.मी., नांदुरा ११९ मि.मी., खामगाव १३३ मि.मी., शेगाव १४५ मि.मी. व संग्रामपूर तालुक्यात १९९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सोमवार, ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार बुधवारी सकाळपर्यंत सुरूच होती. या ३0 तासांत जिल्ह्यात तब्बल १८४७.१ मि.मी. पाऊस झाला. त्याची सरासरी १४४.२ मि.मी. इतकी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत पडलेल्या एकूण पावसाची टक्केवारी ४४.२८ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३१५.६ मि.मी. पाऊस झाला. मागील दीड महिन्यांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणीची वेळ आली होती; मात्र सोमवारपासून सर्वदूर सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. थोडाही खंड न पडता सुरू असलेला पाऊस तब्बल ३0 तास संततधार पडत होता. बुधवारी मात्र पावसाचा जोर कमी झाला, तर पावसाची रिपरिपही सुरूच होती.

प्रकल्पांतील जलाशयात वाढ

       मंगळवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठय़ा प्रकल्पांमधील जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळांचे, तर ७४ लघु प्रकल्प आहेत. नळगंगा प्रकल्पात उपयुक्त साठा १५.३८ दलघमी आहे. याची टक्केवारी २२.१८ आहे. पलढग प्रकल्पाचा उपयुक्त साठा २.६८ दलघमी आहे. या प्रकल्पात उपयुक्त साठा ३५.६९ टक्के आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाचा उपयुक्त साठा १0.३१ दलघमी एवढा आहे. याची टक्केवारी ३0.३९ आहे. मस प्रकल्पाचा उपयुक्त साठा ५.४७ दलघमी आहे, तर टक्केवारी ३६.३९ टक्के आहे.