शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविले उशिरा

By admin | Updated: April 15, 2017 00:21 IST

आ.बोंद्रे व आ.सपकाळ यांचा आरोप : जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्याचे भासविले!

चिखली : जिल्ह्यातील अनेक गावांनो तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने अनेक ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी मार्च महिन्यापासून सादर केलेला प्रस्ताव तब्बल दीड महिना उलटूनही महसूल विभागाने मंजूर केला नसल्याची बाब आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निदर्शनास आली़ याप्रकरणी उभय आमदारांनी जिल्हाधिकारी झाडे यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्याचे भासविण्यासाठी एक महिना उशिराने पाणीटंचाईग्रस्त गावांचे टँकरचे प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवा, असे फर्मान शासनाच्यावतीने देण्यात आल्याचा आरोप आमदारद्वयांनी केला आहे.याबाबत सविस्तर असे की, बुलडाणा तालुक्यातील गिरडा, दत्तपूर, रायपूर, हनवतखेड, चौथा, गोंधनखेड, देउळघाट, माळविहीर, जांब, शिरपूर व चिखली तालुक्यातील भोगावती, सैलानी नगर, डोंगरशेवली, कोलारा या गावात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे ग्रामपंचायतीने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्याकरिता विहित नमुन्यात प्रस्ताव मार्च महिन्यामध्ये शासनाकडे सादर केला होता़ मात्र राज्य शासन राबवित असलेली जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी दाखविण्याकरिता टँकरचे प्रस्ताव एक महिना उशिराने पाठवावे, असे फर्मान महसूल विभागाच्यावतीने सोडण्यात आल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब आमदार राहुल बोंद्रे व अमदार हषर्वधन सपकाळ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी झाडे यांना याप्रकरणी चांगलेच धारेवर धरले व शासन राबवित असलेले जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात खरी माहिती जनतेला व शासनाला द्या, अशा सूचना करीत उपरोक्त गावाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करून घेतल्यामुळे उपरोक्त १४ गावांना टॅकरद्वारे लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे़ यावेळी जि.प. सदस्य जयश्री शेळके, काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष सुनील तायडे, अ‍ॅड़ शरद राखोंडे, दिलीप जाधव, अनिल वारे, पं.स.उपसभापती रसुल खान, अमिनखॉ उस्मानखॉ व संबंधित गावचे सरपंच उपस्थित होते़