शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा परिषदेचे आठ कोटी ३३ लाख शिलकीचे अंदाजपत्रक सादर

By admin | Updated: March 28, 2015 01:48 IST

ग्रामीण पाणीपुरवठा व महिला बालकल्याणसाठी भरीव तरतूद.

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात २0१५-१६ या आर्थिक वर्षाचे ८ कोटी ३३ लाख रुपये शिलकी अंदाजपत्रक २७ मार्च रोजी सादर करण्यात आले आहे. शासनाने विहित केलेल्या टक्केवारीनुसार मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांसाठी उत्पन्नाच्या वीस टक्के, तर समाज कल्याण व महिला आणि बालकांच्या कल्याणकारी योजनांसाठी १0 टक्के निधी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी वीस टक्के निधीची या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात अर्थ व बांधकाम सभापती अंकुशराव वाघ यांनी २0१४-१५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यासह सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे महसुली व भांडवल ३९ कोटी ७९ लाख ३९ असून त्यामध्ये महसूल २७ कोटी ८४ लाख ९0 हजार २६२ व भांडवली ११ कोटी ९४ लाख ४९ हजार ६३२ रुपये असे आहे, तर अंदाजपत्रकानुसार अपेक्षीत खर्च ३१ कोटी ४५ लाख ९४ हजार असून, त्यामध्ये महसुली २२ कोटी ९४ हजार ४0 हजार ९00 तर भांडवली खर्च ८ कोटी ५१ लाख ५४ हजार रुपयांचा समावेश आहे. या अंदाजपत्रकात समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय शेतकर्‍यांना ताडपत्री व शेतीची अवजारे, वीज पंप, शेती उपयोगी अवजारे तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ४ कोटी ५५ लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे; तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी ८२ लाख ६९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर मागील वर्षी या योजनांवर ६ कोटी ४३ लाख ७0 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर जवळपास सात कोटी रुपयांची वाढ या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. अपंगाच्या कल्याणासाठी एक कोटी ३५ लाख रुपये, जिल्ह्यातील दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी १५ लाख, महिला व बालकल्याण योजनेंतर्गत महिला व मुलींच्या प्रशिक्षणासाठी त्या विभागाचा पन्नास टक्के निधी ठेवण्यात आला असून, तो १ कोटी ५५ लाख २५ हजार एवढा आहे. इतर कृषी कार्यक्रमासाठी १ कोटी ६९ लाख ५८ हजार, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालनासाठी ७६ लाख ५0 हजार, ग्रामीण भागातील रस्ते बांधकाम व दुरूस्तीसाठी ५0 कोटी, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणासाठी ३ कोटी २0 लाख, पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी ५३ लाख ६0 हजार, सार्वजनिक आरोग्यासाठी ९३ लाख ७१ हजार, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेच्या दुरुस्ती व बांधणीसाठी १ कोटी ४७ लाख, पंचायत राज कार्यक्रमासाठी दोन कोटी ७३ लाख ८१ हजार, शालेय विद्यार्थ्यांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शैक्षणिक साधन सामग्रीसह शाळा दुरूस्तीसाठी ८४ लाख २८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; तसेच आदर्श ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व संत गाडगेबाबा पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.