बिबी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:18+5:302021-04-15T04:33:18+5:30

लघु व्यावसायिक संकटात बुलडाणा : गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने १५ एप्रिलपासून निर्बंध कडक केले ...

Presence of unseasonal rains in Bibi area | बिबी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

बिबी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

Next

लघु व्यावसायिक संकटात

बुलडाणा : गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने १५ एप्रिलपासून निर्बंध कडक केले आहेत़ त्यामुळे लघु व्यावसायिक संकटात सापडले आहेत़ सततच्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचा राेजगार गेला आहे़

भाजीपाला विक्रेत्यांना दिलासा

बुलडाणा : वाढत्या काेरोना संसर्गामुळे जिल्ह्यात १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत़ यामध्ये भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत विकता येणार आहे़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे़

मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड

बुलडाणा : वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लादले आहेत़ यामध्ये मास्कचा वापर न केल्यास ५०० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे़ तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतानाही मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे़

फोटो न दिलेल्यांची नावे वगळणार

जळगाव जामोद : निवडणूक आयोगाने वारंवार कळवूनही मतदारांकडून बीएलओकडे फोटो सादर करण्यात विलंब होत आहे. यामुळे बीएलओकडे फोटो सादर न करणाऱ्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे.

दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

मलकापूर : दिव्यांगांच्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्या, अशी मागणी लोणार अपंग सेवाभावी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कृषीपंपाच्या वीजजोडण्या रखडल्या

जळगाव जामोद : तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणकडे कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या रखडल्या आहेत. या शेतकऱ्यांचे अर्ज तत्काळ निकाली काढण्याची मागणी संतोष बगाडे यांनी मंगळवारी केली आहे.

Web Title: Presence of unseasonal rains in Bibi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.