शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी रोखला बालविवाह !

By admin | Updated: July 3, 2017 14:09 IST

वीस मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पळा.. रे पळा..! पोलिस गाडी आली.. म्हणत वऱ्हाडींची धावपळ उडाली़

ब्राम्हणी : रविवारी दुपारचे बारा वाजण्याकडे काटा झुकत होता़ लग्नाची घटिका जवळ येत होती़ अचानक मंडपातील एकाने राहुरी पोलीस स्टेशनला मोबाईवरून अल्पवयीन मुलीच्या विवाहाची खबर दिली़ वीस मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पळा.. रे पळा..! पोलिस गाडी आली.. म्हणत वऱ्हाडींची धावपळ उडाली़ पोलिसी खाक्या दाखविताच वधू-वराच्या नातेवाईकांनी दोन पाऊले मागे घेत लग्नावर पाणी सोडले़ लेखी घेत पोलिसांनी नातेवाईकांना समज देऊन सोडले़ब्राम्हणी येथील तोडमल वस्तीवर थोड्याच वेळात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना रविवारी दुपारी मिळाली़ लागलीच पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोलीस हेड कॉन्स्टेबल एस़ आऱ बहिरवाल, दिवटे व नेटके घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी वधू-वराकडील नातेवाईकांचे प्रबोधन केले़ तरी देखील त्यांचे परिवर्तन होण्याचे चिन्हे दिसेना़ अखेर खाकी वर्दीचा सज्जड इशारा दिल्यानंतर लग्न रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले़बँड पथक, मंडपवाले, आचाऱ्यांनी ठोकली धूमब्राम्हणी येथील २७ वर्षाचा मुलगा व मढी येथील १४ वर्षांची मुलगी यांचा विवाह थांबविण्यासाठी पोलिसांचे मंडपात आगमन होताच मंडपवाला, भटजी, बँडपथक, आचारी यांनी लग्नमंडपातून धूम ठोकली़ पोलीस दाखल झाल्याने वधू-वरांना शुभमंगल सावधान होण्यापूर्वीच माघार घ्यावी लागली़ कोणत्या नातेवाईकाने पोलिसांने कळविले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ परंतु फोन करणारा गुलदस्त्यातच राहिला़वधू-वरांचे केले प्रबोधनब्राम्हणी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती निनावी फोनव्दारे कळाली़ घटनास्थळी गेल्यानंतर मुलीचे वय १४ तर मुलाचे वय २७ असल्याचे आढळून आले़ वधू-वरांना कायद्याची बाजू सांगून प्रबोधन करण्यात आले़ लेखी घेण्यात आले असून अल्पवयीन मुलगी असल्याने साखर पुड्यात होणार विवाह रद्द करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी सांगितली़