शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

कुजलेल्या अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला!

By admin | Updated: June 1, 2017 00:44 IST

मोताळा : बोराखेडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कुजलेला मृतदेह चिखली येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निर्माणधिन घरात बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कुजलेला मृतदेह चिखली येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निर्माणधिन घरात बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली. बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस हेड कॉन्सटेबल रमेश शिवाजी मिसाळकर (ब. न. १५५७) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बोराखेडी येथील वार्ड क्र. ५ मधील साईनगरमधील सुषमा उईके यांच्या घरात आढळला. साईनगरमधील रहिवासी महिलांनी सकाळी ८ वाजता नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी उठल्यानंतर बाजूलाच असलेल्या सुषमा उइके यांच्या नवीनच बांधकाम होत असलेल्या घरामधून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महिलांनी ग्रामपंचायत सदस्य असलेले सुनील आत्माराम तेलंग यांना याबाबत माहिती दिली. तेलंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे तेलंग यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली असता घरामध्ये पोलीस हेड कॉन्सटेबल रमेश शिवाजी मिसाळकर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा व उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकले नसून, याबाबत परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील तेलंग यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी १७४ भादंवि नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार सुनील हुंड करीत आहेत.