दगडफेक करणा-या ९0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: October 9, 2014 00:41 IST2014-10-09T00:22:28+5:302014-10-09T00:41:17+5:30

अंढेरा येथील सानप हत्या प्रकरण; २५ आरोपिंना अटक.

The police file a case against 90 stone-throwing people | दगडफेक करणा-या ९0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दगडफेक करणा-या ९0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंढेरा (बुलडाणा) : येथील गणेश भानुदास सानप या युवकाची हत्या करणार्‍यांना पोलिसांनी अटक केली नाही, असा आरोप करुन ६ ऑक्टोबर रोजी मृत गणेशच्या नातेवाइकांनी अंढेरा पोलिस स्टेशनवर दगडफेक केली होती. याप्रकरणी आज अंढेरा पोलिसांनी गावातील ९0 लोकांवर गुन्हे दाखल केले. तर २५ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज ८ ऑक्टोबरच्या पहाटे ४ वाजे पासून गावात ही कारवाई सुरु असल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश सानपचा मृतदेह ४ ऑक्टोबर रोजी दुपारी परिसरातील एका शेतात आढळून आला होता. त्या युवकाची हत्या झाल्याची पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे मृत गणेशचा भाऊ रामेश्‍वर सानप याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार लोकांवर ३0२ अधिक ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तरी पोलिस तपासात दिरंगाई होत आहे, तसेच गुन्हा दाखल करुनही पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली नाही, असा आरोप करुन मृत गणेशच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ६ ऑ क्टोबर रोजी संतप्त झालेल्या नातेवाइकांनी अंढेरा पोलिस स्टेशनवर दगडफेक केली होती. यात सात पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विश्‍वनाथ नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनात आज पहाटे ४ वाजतापासून गावात कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले. यात दिवसभरात करण्यात आलेल्या कारवाईत गावातील ९0 जणांवर भादंविच्या ३६३, ३३२, ३५४, १४३, १४७, ५0६, ५0४ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानासाठी कलम ३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तर २५ लोकांना अटक केली आहे.

Web Title: The police file a case against 90 stone-throwing people